June 26, 2019
HW Marathi
महाराष्ट्र

आजच्या पिढ्यांनी पाहिलेले दुष्काळाचे हे चित्र, पुढच्या पिढीला दिसणार नाही !

औरंगाबाद | “आजवरच्या पिढ्यांनी पाहिलेले दुष्काळाचे हे चित्र पाहिले. परंतु पुढच्या पिढीला हे चित्र दिसणार नाही,” असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (८ जून) औरंगाबदेतील लासूर स्टेशन गावच्या चारा छावणीला भेटीदरम्यान नागरिकांशी संवाद साधताना म्हणाले.

“मराठवाडा म्हणजे १२ महिने दुष्काळ आजवरच्या पिढ्यांनी हेच चित्र पाहिले. पण पुढच्या पिढीला हे चित्र दिसता कामा नये, या दिशेने आम्ही काम करतो आहे. मराठवाड्यातील दुष्काळ हा भूतकाळ झाला पाहिजे आणि तो केल्याशिवाय आपण राहणार नाही.” मराठवाड्यातून दुष्काळ हद्दपार करण्यासाठी येथील प्रमुख ११ धरणे पाईपलाईनने एकमेकांना जोडण्यात येणार आहेत.

पाईपच्या माध्यमातून पिण्याचे पाणी मराठवाड्यात सर्वत्र पोहोचवले जाणार आहे. पिण्याचे पाणी प्रत्येक ठिकाणी पोहचवण्याची वॉटर ग्रीड योजना आखण्यात आली आहे. जलयुक्त शिवारमुळे दुष्काळातही तुलनेने कमी नुकसान झाले. यंदा पाऊस थोडा जरी पडला तरी शेतकऱ्याला दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

Related posts

मुंबई पोलीस दलात कार्यरत असणा-या महिलेची साता-यात आत्महत्या

News Desk

स्मृती इराणी विरोधात हडपसर पोलिसांत तक्रार

News Desk

विघ्नहर्त्याला ही प्लास्टिक बंदीचे विघ्न

News Desk