HW News Marathi
महाराष्ट्र

मख्यमंत्री साम, दाम, दंड, भेद वापरून आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करतायत !

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काँग्रेस आमदारांना आणि नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. चव्हाण यांनी मुंबईतल्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दिलेली ही प्रतिक्रिया देताना म्हणाले आहे. माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील लवकरच भाजपमध्ये दाखल होत आहेत. तसेच काही काँग्रेस आमदारही भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर हा आरोप केल्याचे म्हटले जाते.

लोकसभा निवडणुकीतील दारुण परभवानंतर काँग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधीसह अनेक दिग्गज नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. तर तेलंगणामध्ये काँग्रेसच्या १२ आमदारांनी तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये विलीन होण्यासाठी राज्यातील विधानसभा अध्यक्षांकडे मागणी केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत मित्रपक्षांशी चर्चा करण्यापूर्वी पक्षातील कार्यकर्त्यांशी चर्चा गेली असल्याचे चव्हाणांनी सांगितले. काँग्रेसने घेतलेल्या या बैठकीत स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात नाराजी असल्याचे चित्र दिसून आले. आघाडी झाली तरी राष्ट्रवादीचे लोक खाली मतदारसंघात काँग्रेसला मदत करत नाहीत. उलट राष्ट्रवादीचे लोक भाजपला मदत करतात. त्यामुळे राष्ट्रवाडीबरोबर आघाडी नको, असा सूर बैठकीत उमटला. त्याऐवजी वंचित बहुजन बरोबर आघाडी करावी अशीही भूमिका मांडण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धक्कादायक ! बारामतीत एकाच कुटुंबातील ५ जण कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

ईडी कडून ज्यांना नोटीस गेली ते अनिल परब नेमके कोण आहेत?

News Desk

कोल्हापूर विमानतळच्या नवीन टर्मिनल बिल्डिंगचे काम मार्च अखेर पूर्ण करा! – ज्योतिरादित्य सिंधिया

Aprna