HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन

मुंबई | येत्या 22 तारखेपासून दिवाळी सुरू होत असून सणासाठी म्हणून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना (Government Employees) दिवाळीपूर्वी वेतन (Diwali Bonus) आणि निवृत्ती वेतन देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मान्यता दिली आहे.

 

एरव्ही ऑक्टोबरचे वेतन नोव्हेंबरमध्ये होत असते. मात्र दिवाळी 22 ऑक्टोबरपासून असल्यामुळे सणानिमित्त खरेदी व इतर कारणांसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

 

या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषद मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठे व अकृषी विद्यापीठे यातील कर्मचाऱ्यांना होईल. वेतन देयके त्वरित कोषागार कार्यालयात दाखल करण्यासंदर्भात देखील सूचना देण्यात आल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाराष्ट्रात महाविकासआघाडी ‘मिनी यूपीए’चा प्रयोग!” – संजय राऊत

News Desk

झारखंड सरकार पाडण्यात आपला हात नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण

News Desk

जनता मराठीतून कामकाज करणार आणि अधिकाऱ्यांना इंग्रजीची मुभा देणार का? – आशिष शेलार

Aprna