HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली

मुंबई | “नगरसेवक, महापौर ते विधिमंडळातील तडफदार प्रतिनिधी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविणारे नेतृत्व काळाने हिरावून नेले आहे”, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच दिवंगत जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

आमदार जगताप यांनी स्वकर्तृत्वाने कारकीर्द घडवली. पिंपरी-चिंचवडचा विकास हा त्यांचा ध्यास होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. विधिमंडळातही ते आपला मतदारसंघ आणि परिसरातील समस्या, अडचणी यासाठी हिरीरीने काम करत असत. लोकहिताच्या दृष्टीने अनेकदा त्यांनी संघर्षशील भूमिका घेतली. आजारपणाशीही त्यांचा प्रदीर्घ लढा सुरू होता. यातही त्यांनी आपले कर्तव्य बजावताना कुचराई केली नाही. पण नियतीला हे मान्य नसावे आणि आमदार जगताप यांना काळाने हिरावून नेले. हा त्यांच्या परिवारासह, कार्यकर्ते, चाहत्यांसाठी मोठा आघात आहे. जगताप कुटुंबियांना या आघातातून सावरण्यासाठी बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लोकप्रिय आमदार लक्ष्मण जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली! असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

लक्ष्मण जगताप यांचा अल्पपरिचय

लक्ष्मण जगताप यांनी 1986 सालापासून राजकीय कारकिर्दला सुरुवात केली होती. ते पहिल्यांदा 2002 नगरसेवक झाले होते. या काळात लक्ष्मण जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष होते. लक्ष्मण जगताप यांनी याच साली पुण्याचे महापौरही राहिले होते.  यादरम्यान लक्ष्मण जगताप यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले होते. लक्ष्मण जगताप यांनी 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले  आणि विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढवून विजयी झाले होते. यानंतर 2009मध्ये ते विधानसभेची निवडणूक लढवून आमदार झाले. आणि 2014 मध्ये तिसऱ्यांदा विधानसभेवर आमदार म्हणून गेले होते. 2017 मध्ये पिंपरीचे शहराध्यक्ष पद देखील लक्ष्मण जगताप यांनी भूषविले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी प्रयत्न करा – रविंद्र चव्हाण

Manasi Devkar

विधान परिषदेच्या अकोल्याच्या जागेवर भाजपच्या वसंत खंडेलवाल यांचा विजय

News Desk

डिसेंबर उजाडेपर्यंत महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार स्थानापन्न होईल !

News Desk