HW News Marathi
Covid-19

“मुख्यमंत्री साहेब, सरकार इतकं निर्दयी कसं झालं…?” नववर्षाच्या मुहूर्तावर ‘मनसे’चा बोचरा सवाल 

मुंबई | राज्यात काहीच दिवसांपूर्वी वाढीव वीजबिलांचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला होता. या मुद्द्यामुळे विरोधकांकडून महाविकासआघाडी सरकारला चांगलेच कोंडीत पकडण्यात आले होते. आता पुन्हा एकदा नव्या वर्षाच्या निमित्ताने पहिल्याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने “मुख्यमंत्री वाढीव वीज बिलाचं काय झालं?” असा सवाल उपस्थित करत सरकारविरोधात वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर बॅनर लावून नववर्षाच्या शुभेच्छा देत वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरून टोला लगावला आहे.

“#मुख्यमंत्री वाढीव वीज बिलाचं काय झालं?”, या हॅशटॅगसोबत आपल्या बॅनरद्वारे ‘मनसे’ने असे म्हटले आहे कि, “मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्री महोदय गोड बोलता बोलता नवीन वर्ष आलं. गोड बातमी तर राहिली दूर पण जनतेचे हालचं हाल झाले. जनतेच्या खिशात पैसा नाही तरी वीज बिल भरा, ऊर्जा मंत्री म्हणाले. मुख्यमंत्री साहेब सरकार इतकं निर्दयी कसं झालं…?” असा सवालही यावेळी मनसेने उपस्थित केला आहे. त्यामुळे, आता सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा वाढीव वीजबिलाचा हा मुद्दा पुन्हा पेटणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीजबिलांच्या माफीबाबत राज्यातील विरोधात ठाकरे सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते. याच पार्श्वभूमीवर राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपनंतर २६ नोव्हेंबर २०२० रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यभरात महत्त्वाच्या शहरांमध्ये वीजबिलवाढीविरोधात महामोर्चा काढण्यात आला होता. यावेळी, मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये मनसेचे शेकडो कार्यकर्ते वीजबिलमाफीची मागणी करत रस्त्यावर उतरले होते. आता पुन्हा एकदा मनसे याच मुद्द्यावरून सरकारविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Virafin औषधाला भारतात परवानगी ! कोरोनारुग्णांचा रिपोर्ट ७ व्या दिवशी  निगेटिव्ह 

News Desk

पुणे शहरातील कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी भाजपचे नगरसेवक, आमदारांसह खासदार आता होणार ‘चौकीदार’

News Desk

जगात कोरोना बाधितांचा आकडा ६७ लाखांच्या पुढे

News Desk