HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्री उद्या रायगड दौऱ्यावर, चक्रीवादळग्रस्तांना मदतीचे वाटप

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (१४ जून) म्हणजेच रविवारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चौल, बोर्ली, मुरुड येथे चक्रीवादळग्रस्तांना त्यांच्या हस्ते मदत साहित्य आणि अनुदान वाटप केले जाणार आहे. रविवारी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री मांडवा जेट्टी येथे पोहचतील. त्यानंतर चौल येथे जाऊन ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतील. सकाळी 11 वाजता चौल मधील घरे, पिके नुकसानीची पाहणी करून त्यानंतर त्यांच्या हस्ते सानुग्रह अनुदान, सौर कंदील, इतर साहित्याचे वाटप करण्यात येईल.

रविवारी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोर्ली तर त्यानंतर १२.३० वाजता मुरुड येथे पोहोचतील. बोर्ली आणि मुरुड या दोन्ही ठिकाणी नुकसानीची पाहणी आणि मदत वाटप करण्यात येईल. त्यानंतर मुरुड येथे मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद देखील होईल. तर दुपारी ३ वाजता मांडवा जेट्टी येथून बोटीने मुख्यमंत्री पुन्हा मुंबईकडे रवाना होतील. मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्धव ठाकरेंच्या रविवारच्या या रायगड दौऱ्याची ही सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive | कोरोना रुग्ण लपविण्यासाठी बीएमसी अन् राज्य सरकारचे हे मोठे षडयंत्र, तावडेंचा आरोप

News Desk

कोरोना १०० वर्षातील सर्वात मोठे संकट – शक्तिकांत दास

News Desk

राज्यात दुसऱ्यादिवशी देखील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त

News Desk