HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री एच.एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल, शस्त्रक्रियेची शक्यता

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती काहीशी ठीक नसल्याचं वृत्त आहे. मान आणि मणक्याच्या त्रासामुळे बुधवारी (१० नोव्हेंबर) उद्धव ठाकरेंना गिरगावातील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विशेषतः गेल्या आठवड्याभरापासून मुख्यमंत्र्यांना हा त्रास अधिक प्रमाणात जाणवत असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज (११ नोव्हेंबर) सकाळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उद्धव ठाकरेंच्या विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सध्या गिरगावातील एच. एन. रिलायन्स रुग्णालयातील १९ व्या मजल्यावर विशेष कक्षात दाखल करण्यात आलं आहे. आज होणाऱ्या चाचण्यांच्या अहवालानंतर शस्त्रक्रियेच्या निर्णयाबत वरिष्ठ डॉक्टर उद्धव ठाकरेंशी चर्चा करतील. त्यानंतर मानेच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया करायची की नाही हा निर्णय घेतला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासूनच मुख्यमंत्र्यांची प्रकृती काहीशी अस्वस्थ असल्याचं दिसून आलं होतं.

आंदोलक ST कर्मचाऱ्यांसाठी संदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आंदोलक ST कर्मचाऱ्यांना एक आवाहन केलं आहे. “ST कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.अशा परिस्थितीत , कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. अशी हात जोडून विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विकसित, विकसनशील आणि आर्थिकदृष्ट्या प्रबळ देशांनी एकत्र येण्याची गरज, WHO चा सल्ला

swarit

‘त्या’ सुसाईड नोटमध्ये नामोल्लेख असलेल्या लोकांचा राष्ट्रवादीशी काडीमात्र संबंध नाही !

News Desk

अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण १७ विधेयके संमत नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी दोन्ही सभागृहात सविस्तर चर्चा! – अजित पवार

Aprna