HW News Marathi
महाराष्ट्र

HW Exclusive : मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणी मला अडकवण्यात मुख्यमंत्र्यांचा हात, दरेकरांचा आरोप

मुंबई | मुंबै बँक मजूर प्रकरणात भाजपचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची पोलिसांनी तीन तास चौकशी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नोटीस पाठवल्यानंतर आज (४ एप्रिल) माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात दरेकर चौकशीसाठी आले होते. पोलिसांनी दरेकरांची तीन तास चौकशी पूर्ण केल्यानंतर त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी खास बातचीत केली. “या प्रकरणी मला अडकवण्यात मुख्यमंत्र्यांचा हात आहे,” असा आरोप त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना केला आहे. चौकशीदरम्यान तुमच्यावर दबाव आणला जात होता का?, हा प्रश्न एच. डब्ल्यू. मराठीच्या पत्रकारांनी दरेकरांना विचारल्यावर ते म्हणाले. “माझ्यावर दाखल केलेला एफआयआर हा दबावाखाली दाखल केला आहे.” 

पोलिसांच्या तीन तास चौकशीत काय काय विचारले, या प्रश्नावर दरेकर म्हणाले, “मी पोलिसांना चौकशीच्या अनुषगांने उत्तरे दिली असून पोलिसांना जी जी माहिती हवी होती, ती ती माहिती मी त्यांना दिली आहे. या व्यतिरिक्त पोलिसांना जी माहिती हवी आहे. ती माहिती देण्यास मी तयार आहे. आम्ही पहिल्यापासून मागणी करतोय की, तुम्ही सरळ सरळ ताब्यात कसे घेऊ शकता. यासाठी तुम्ही ‘फॉल्ट वन अ’ नोटीस पाठवायला हवी होती. मग आम्ही शेवटी सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयात सांगितले. आणि आता त्यांना नाईलाज म्हणून नोटीस द्यावी लागली. 

“मुळात हा एफआयआर हा दबावाखाली केला आहे. मग आपण केलेला एफआयआर कासा योग्य आहे. हे दाखवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. आणि तो दबावा त्या ठिकाणी जाणवत होता. चौकशीदरम्यान तुमच्यावर दबाव आणला गेला का?, असा प्रश्न जेव्हा एच. डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधींनी विचारला तेव्हा त्यांनी हे उत्तर दिले. पोलिसांनी चौकशीदरम्यान फोन ताब्यात घेतला, या प्रश्नावर दरेकर म्हणाले, “माझा फोन डिचार्ज होता आणि तो पोलिसांनी ताब्यात घेतला. आणि चौकशीनंतर माझा फोन दिला, त्या ठिकाणी मला काहीसा विसंवाद जाणवला होता. पोलिसांनी पुन्हा चौकशीसाठी बोलवल्यावर जाणार का?, या प्रश्नावर ते म्हणाले, “पोलिसांना आम्ही पूर्ण सहकार्य करणार असून पोलीस जेव्हा जेव्हा बोलवणार, तेव्हा तेव्हा मी त्यांना माहिती देण्यास येईन. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा दबाव आहे, असे तुम्हाला वाटते का?, या प्रश्नावर दरेकर म्हणाले, “होय, यात मुख्यमंत्र्यांचा हात आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेचा बक्षी समितीचा अहवाल स्वीकारला 

Aprna

उद्धव ठाकरे-शरद पवारांमध्ये रात्री उशिरापर्यंत बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला, खातेवाटपावर चर्चा

News Desk

पुण्यातील कोंढवा बुद्रुकमध्ये बनावट पनीर कारखान्यावर कारवाई

Manasi Devkar