HW News Marathi
महाराष्ट्र

मुस्लिम आरक्षण संदर्भात कोणताही मुद्दा सरकारसमोर आलेला नाही !

मुंबई | “अजूनपर्यंत मुस्लिम आरक्षण संदर्भात कोणताही मुद्दा सरकारसमोर आलेला नाही आहे आणि म्हणून मला असे वाटते की जो मुद्दा आमच्यासमोर आलेला नाही, त्याच्यावर कोणी आदळआपट करण्याची गरज नाही आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले. ” राज्यातील महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

येत्या ७ तारखेला मी अयोध्येला जातो आहे, राम मंदिरात जातोय, श्रीरामाचे दर्शन घेणार आहे. हे मी एका श्रद्धेने करतोय, एका भावनेने करतोय. देव देव असोत आणि तो संगळ्यांबरोबर असतो. देव दर्शनात कोणतेच राजकारण नाही, असे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (३ मार्च) विधानभवनातील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्यांना शिवसैनिकांना शक्य आहे त्यांनी अयोध्येत दर्शनेसाठी यावे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. सीएएवरील मुख्यमंत्र्यांनी पुन्हाएकदा त्यांची भूमिका स्पष्टकरत म्हटले की, “मी पुन्हा एकदा सांगतोय की माझ्या राज्यातल्या कोणत्याही नागरिकाचा अधिकार मी कोणालाही हिसकावून घेऊ देणार नाही, ही माझी मुख्यमंत्री म्हणून भूमिका स्पष्ट आहे.”

सामनाची भाषा आणि दिशा बदलली नाही

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचे संपादकपद हे उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यावर सामनाची भाषा बदलणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे. संपादकीय विभागाची जबावदारी संजय राऊतांकडेच राहणार. माझे विचार यापुढेही सामनातून समोर येतील. सामनाची भाषा आणि दिशा बदलली नाही. तर संपादकपद ही आमची अंतर्गत मांडणी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सामनाची भाषा ही आमची पितृभाषा आहे.

शेतकऱ्यांनी सरकारवर विश्वास ठेवला

“मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची अंमलबजावणी दोन महिन्यांत सुरू झाली आणि मला शेतकऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत की त्या २ महिन्यांत त्यांनी कुठेही त्यांचा संयम सोडला नाही. त्यांनी पूर्णपणे सरकारवर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासामुळेच आम्ही ही योजना आणि यंत्रणा चांगल्या पद्धतीने लावू शकलो.”

 

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

 

  • राज्यातील एकाही नागरिकांचे नागरिकत्व हिरावून घेणार नाही
  • मोदी मोठे बंधू त्यांच्याबाबत बोलणार नाही
  • आचारसंहितेमुळे काही भागत शेतकरी कर्जमाफीची यादी नाही
  • मराठा आरक्षणावर सरकार ताकदीने लढत आहे
  • एनपीआरबाबत समन्वयक समिती निर्णय घेणार
  • ७ मार्चला अयोध्यात श्रीराम दर्शनाला जाणार, देव सर्वांचा देव दर्शनात कोणतेच राजकारण नाही
  • शेतकरी योजना लवकरच पुर्ण करण्यात येणार आहे
  • २ लाखापर्यंतच्या सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफ करू
  • मुस्लिम आरक्षणाचा प्रस्ताव माझ्यापर्यंत आलेला नाही, मुस्लिम आरक्षणावर चर्चेनंतर निर्णय घेऊ
  • सामनाची भाषा ही पितृभाषा आहे
  • सामनाची भाषा, दिशा बदलणार नाही
  • सामनाची भाषा शैली ही कायम असणार आहे
  • संजय राऊत हे आमचे कुटुंबातील सदस्य आहेत
  • सामनाच्या संपादकीय पदाची जबाबदारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडे आहे
  • सामना हे आमचे कुटुंब आहे
  • राज्यातील महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नक्षली कारवायांचा शासन कठोरपणे बिमोड करेलच पालकमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास!

News Desk

कराडमधील कृष्णा नदीवरील ब्रिटीशनकालीन पूल कोसळला

News Desk

धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित सतिश चव्हाण यांच्या मागणीला मिळणार यश!

News Desk