HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेला संबोधित करणार

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (२८ जून) दुपारी १.३० वाजता महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री राज्यातील अनलॉक २ संदर्भात घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, देशात अनलॉक १ आणि राज्यात मिशन बिगिन अगेन (पुनश्चः प्रारंभ) अंतर्गत राज्य शासनाने टप्प्या टप्प्याने लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल केले होते. मात्र, यानंंतर देशासह राज्याची कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत जाताना दिसत आहे. राज्यात गेल्या तीन दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढाने वाढत होता आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार किंवा अनलॉक २ संदर्भात काय घोषणा करणार, याकडे सर्वांचे राज्यातील जनतेचे लक्ष लागेल आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. मोदी हे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. देशभरात कोरोनामुळे जवळपास दोन महिन्यांपर्यंत लॉकडाऊन होता. देशात अनलॉक १ अंतर्गत सर्व हळूहळू सुरू करण्यात आले. मात्र, तरी देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आता अनलॉक २ बद्दल चर्चा सुरू झाली आहे. आज मोदी मन की बातमधून अनलॉक २ संदर्भात काय बोलणार किंवा या सूचना देणार हे पाहावे लागेल

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कोर्ट’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते वीरा साथीदार यांचे निधन

News Desk

शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण 

News Desk

देशात गेल्या २४ तासात ९९८३ नवे कोरोना रुग्ण आढळले

News Desk