HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर उद्या होणार शस्त्रक्रिया

मुंबई । मान आणि मणक्याच्या त्रासामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून काहीशी अस्वस्थ आहे. याच पार्श्वभूमीवर, बुधवारी (१० नोव्हेंबर) उद्धव ठाकरेंना गिरगावातील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार उद्या (१२ नोव्हेंबर) सकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास एच. एन. रुग्णालयात मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर उद्या म्हणजेच शुक्रवारी डॉ. शेखर भोजराज यांच्या नेतृत्वाखाली शस्त्रक्रिया होणार आहे. आज (११ नोव्हेंबर) दिवसभरात झालेल्या विविध वैद्यकीय तपासण्या आणि त्यांच्या अहवालानंतर उद्धव ठाकरेंना एक लहानशी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ठाकरे कुटुबीयांशी झालेल्या चर्चेनंतर अखेर उद्या उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

मुख्य म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रकृती संदर्भातील संपूर्ण अधिकृत माहिती ही रुग्णालय नव्हे तर मुख्यमंत्री कार्यालयच देणार असल्याची माहिती मिळते. विशेषतः गेल्या आठवड्याभरापासून मुख्यमंत्र्यांना हा त्रास अधिक प्रमाणात जाणवत असल्याचं सांगितलं जात आहे.

आंदोलक ST कर्मचाऱ्यांसाठी संदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आंदोलक ST कर्मचाऱ्यांना एक आवाहन केलं आहे. “ST कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.अशा परिस्थितीत , कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. अशी हात जोडून विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

४ खासदार निवडून येतात त्यांना लोकनेता म्हणता, मग ३०३ खासदर निवडून देणाऱ्या मोदींना काय म्हणायचं? पडळकरांचा सवाल

News Desk

“अनिल बोंडें याचं मानसिक संतुलन बिघडले आहे” -अशोक चव्हाण

News Desk

नव्या वर्षात पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाची विजयी पताका फडकली!

Aprna