HW News Marathi
महाराष्ट्र

ED ची ठाण्यात मोठी कारवाई, मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांची संपत्ती जप्त

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महुणे श्रीधर पाटणकर यांच्या संपत्ती ईडीने जप्त केली आहे. पाटणकरांची ६ कोटी ४५ लाखांची मालमत्तेवर ईडीकडून टाच. पाटणकरांचे ठाण्यातील ११ फ्लॉट्स (सदनिका) ईडीने सील केले आहे. पुष्पक बुलियन फसवणूक प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे. ठाण्यातील निलांबरी प्रोजेक्टमधील ११ सनदिका ईडीने जप्त केले आहे. यापूर्वी ईडीने याआधी पाटणकरांवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. 

 केंद्रीय तपास यंत्रणेचा भाजपकडून गैर वापर होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. राजकीय अकसापोटी ही कारवाई केल्याचे देखील शरद पवारांनी अधोरेखित केले आहे, असे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले. मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांची ईडीने संपत्ती जप्त केल्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. सोमय्या म्हणाले, “श्रीधर पाटणकर, उद्धव ठाकरे यांचा मेहुणा (भाऊ) मनी लाँड्रिंग घोटाळा… शेल कंपन्यांचा वापर करून हा घोटाळा झाला आहे. यामुळे ईडी त्यांची मालमत्ता जप्त केली आहे.  घोटाळेबाजांना सोडणार नाही.” 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भाजप गरुडासारखी, कितीही डोमकावळे मानेवर बसले तरी सगळ्यांना पुरून उरू!”

News Desk

वर्सोवा-घाटकोपर मेट्रो वन सेवा उद्या ‘या’ वेळेत असणार बंद

Aprna

नागपूरमध्ये नाराज शिवसैनिकांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk