HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या आठवडाभर संपूर्ण महारष्ट्र मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनानंतर मराठा आरक्षणाबाबत प्रथम चर्चा होणार आहे.

या बैठकीत खासदार नारायण राणे देखील उपस्थित राहणार आहेत. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तरे द्यावी, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. या बैठकीत आरक्षणाच्या मुद्यावरून काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच सकल मराठा समाजच्या वतीने मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी कोणीही जाऊ नये, असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाचे सर्व प्रश्न माहीत आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ठोस निर्णय घ्यावे. मराठा आंदोलकांना चर्चेला बोलवून त्यांच्या फूट पाडू नये असा इशारा मराठा समाजाने दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले! – नाना पटोले

Aprna

अखेर वंचित बहुजन आघाडीला मिळाले नवे चिन्ह

News Desk

“नवाब मलिक पोस्ट करू शकतात, पण…!” – मुंबई उच्च न्यायालय

News Desk