HW News Marathi
महाराष्ट्र

चीनमध्ये मोठी विमान दुर्घटना, बोईंग ७३७ विमान कोसळले

मुंबई | चीनमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. चीनचे बोईंग ७३७ हे विमान कोसळले असून हे जळून खाक झाल्याची माहिती रायटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे. प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, १३३ प्रवासी बोईंग विमानातून प्रवास करत होते. हे विमान चीनच्या गुआंगशी प्रांतातील जंगलात कोसळले आहे. या विमान प्रवासातील किती प्रवासी बचावले आणि दगावले यांची माहिती अद्याप मिळाली नाही. विमान जंगलात कोसळल्यानंतर जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, या विमान दुर्घटनेत प्रवास करणारे १३३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माहिती अधिकृत अशी माहिती मिळू शकलेली नाही.  रायटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान चीनच्या कुनमिंग येथून ग्वांगझूच्या दिशेन जात होते. हे बोईंग ७३७ विमान गुआंग्शी या भागात कोसळले. या विमानाने पेट घेतल्यानंतर जंगल सुद्धा पेटल्याची माहिती दिली आहे. 

बोईंग हे विमान पश्चिम चीन मधील युन्नान प्रांतातील कुनमिंग शहरातील विमानतळावरून १.१५ वाजता उड्डाण घेतले होते. या विमान ३ वाजेपर्यंत ग्वांगझूला पोहोचणार होते. परंतु, विमान निश्चित ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच दुर्घटनाग्रस्त झाले आहे. 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘भाजपच्या कामाची पोलखोल झाली पाहिजे’, राज ठाकरेंची मागणी

News Desk

देगलूरमधला विजय म्हणजे महाविकास आघाडीवरील जनतेच्या विश्वासावर शिक्कामोर्तब – धनंजय मुंडे

News Desk

मलिकांनी मेहुणीवर केलेल्या आरोपानंतर समीर वानखेडेंचं प्रत्युत्तर

Gauri Tilekar