HW News Marathi
महाराष्ट्र

‘खायचं कुणाचं आणि गायचं कुणाचं?’, चित्रा वाघांचा राऊतांवर निशाणा

मुंबई | भापच्या उपप्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या विरोधी पक्षावर नेहमी निशाणा साधून असतात. दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात राहुल गांधी यांनी पीडिताच्या आईचा फोटो ट्विटरवर पोस्ट केल्यानंतर प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून संजय राऊत यांनी राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबाचा ट्विटरवर फोटो ठेवणे हा गुन्हा आहे का? असा सवाल केला होता. आता या प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला आहे. खायचं कुणाचं आणि गायचं कुणाचं? अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

खायचं कुणाचं आणि गायचं कुणाचं?

चित्रा वाघ यांनी एक विडिओ पोस्ट करून संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. “सर्वज्ञानी संजय राऊत यांना राहुल गांधी यांनी कौतुकाची थाप काय दिली तर आपला त्यावर स्वामीनिष्ठा त्यावर आपली परस्वामीनिष्ठा उफाळून येणे स्वाभाविकच आहे. खायचं कुणाचं आणि गायचं कुणाचं? हे आपलं वागणं खरोखर कौतुकास्पद आहे, पण स्वामीनिष्ठा सिद्ध करण्यासाठी बलात्कारासारख्या गंभीर विषयाचंही राजकीय भांडवल करणं हे निंदनीय आहे”, या शब्दात त्यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.

आम्ही जिजाऊच्या लेकी आहोत

संजय राठोड प्रकरणाचं उदाहरण देत त्यांनी संजय राऊतांना सुनावलं आहे. “पुजा चव्हाणच्या मारेकऱ्यांना कोण अभय देतं आहे आणि पुणे पोलिसांची त्यात कशी भूमिका राहिली आहे, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. नव्या अभिनेत्रीला संधी देतो म्हणून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला आत्ताच लोकांनी चोप दिला. महाविकास आघाडीतील किती जणांचे हात महिलांविरोधी कृत्यांमध्ये बरबटलेले आहेत, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. आपल्या अत्याचाराविरूद्ध सुद्धा माझ्या एका भगिनिने न्याय मिळण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. आम्ही जिजाऊच्या लेकी आहोत. आम्ही आता या अत्याचारी प्रवत्तीविरूद्ध लढायचं ठरवलं आहे. त्यामुळंच की काय आपल्याला भितीपोटी असे दाखले द्यावे लागतात”, असे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

दिल्लीत सामूहिक बलात्काराचं पुन्हा भयंकर प्रकार घडला आहे. यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पीडित मुलीच्या आई- वडिलांचा फोटो ट्विट करत त्यांनी समर्थन दर्शवलं आहे. आता यावरून वाद निर्माण झाले आहेत. मात्र हा फोटो काढावा म्हणून राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला पत्रं लिहिलं आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधींनी पीडित कुटुंबाचा ट्विटरवर फोटो ठेवणं हा गुन्हा आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

ही तर हुकूमशाहीच झाली

राहुल गांधींनी फोटो ट्विट केला यावरून आता राजकारण पेटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकारावरून राहुल गांधींजी बाजू मांडली आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटरवर त्या कुटुंबासोबतचा फोटो टाकला. हा फोटो काढावा म्हणून राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला पत्रं लिहिलं आहे. हा काय प्रकार आहे. ही तर हुकूमशाहीच झाली. त्या कुटुंबाची माहिती विरोधी पक्षाचा नेता जनतेला देत असेल तर गुन्हा आहे का?, असा सवाल करतानाच नरेंद्र मोदी हे सुद्धा निर्भयाच्या कुटुंबांना भेटले होते. भाजपचे अनेक नेतेही गेले होते. तेव्हाही ते फोटो प्रसिद्ध झाले होते. तेव्हा ते फोटो काढा असं राष्ट्रीय महिला आयोग किंवा अन्य कुणी सांगितल्याचं आठवत नाही, असं राऊत यांनी निदर्शनास आणून दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर येत्या काळात भाजपचे काॅंग्रेस हाेईल !

News Desk

“स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी”, नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यावर प्रहार  

News Desk

माझ्या वाढदिवशी कसलीही शो-बाजी न करता गरजू विद्यार्थ्यांना मदत करा !

News Desk