मुंबई।पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण,वन विभागाच्या अधिकारी दिपाली चव्हाण यांचे आत्महत्या प्रकरण अशा महिलांसंबधीच्या विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर पक्ष नेतृत्वाकडून नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे .चित्रा वाघ यांनी स्वत : ट्वीट करून यासंबंधीची माहिती दिली .भाजप प्रदेशच्या उपाध्यक्षा असलेल्या चित्रा वाघ यांची भाजप महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे नियुक्ती पत्र चित्रा वाघ यांना दिले.
युवती आणि महिला या विषयातील प्रदीर्घ अनुभवाची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. चित्राताई वाघ यांची भाजपा महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चित्राताई, मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीकरिता हार्दीक शुभेच्छा! pic.twitter.com/WEKbvd06TA
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 30, 2021
महिलांच्या विषयातील प्रदीर्घ अनुभवाची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांची भाजपा महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर ‘पक्षाने व आपण दाखवलेल्या विश्वासाला मी नक्कीचं सार्थ ठरवेन. पक्षाने दिलेली ही जबाबदारी मी उत्तमरीत्या पार पाडेन हा विश्वास देते’, असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केले.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश ने आज माझी भाजपा महाराष्ट्र – युवती विभागाच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे
पक्षाने दिलेली ही जबाबदारी मी उत्तमरीत्या पार पाडेन हा विश्वास देते
प्रदेशध्यक्ष मा.@ChDadaPatil
विधीमंडळ नेते @Dev_Fadnavis जी मा.@SMungantiwar मनस्वी आभार pic.twitter.com/Z7AkKkA7NE— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 30, 2021
कसा झाला चित्रा वाघ यांचा भाजपात प्रवेश?
राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या नेत्या राहिलेल्या चित्रा वाघ यांनी ३१ जुलै २०१९ भारतीय जनता पार्टीत जाहीररीत्या प्रवेश केला.मी कुठेही पळून गेलेली नाही, मी गद्दार नाही,राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून भाजपात प्रवेश केला आहे. पतीच्या चौकशीचा आणि भाजपचा प्रवेशाचा काहीही संबंध नाही. असेदेखील चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.
चित्रा वाघ यांच्या भाजप प्रवेशावर शरद पवार काय म्हणाले होते?
चित्रा वाघ यांनी पतीला वाचवण्यासाठी भाजपामध्ये जात असल्याचं मला सांगितलं असल्याचं पवार म्हणाले होते . ईडी , सीबीआय यांचा वापर लोकप्रतिनिधींना धमकावण्यासाठी केला जात आहे . सरकार राज्य बँकेद्वारे राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपामध्ये येण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप पवारांनी केला होता . चित्रा वाघ यांचे पती चौकशीच्या जाळ्यात सापडले आहेत . त्यामुळे चित्रा वाघ घाबरल्या आहेत . चित्रा वाघ मला भेटल्या असून , पतीच्या बचावासाठी पक्ष सोडत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं , असं पवार म्हणाले .
पुजा चव्हाण प्रकरणात चित्रा वाघ कशा आक्रमक झाल्या ?
पुण्यात पूजा चव्हाण या युवतीने केलेली आत्महत्या महाविकासआघाडीसाठी चांगलीच अडचणीची ठरली होती.चित्रा वाघ यांनी माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात प्रचंड रान उठवलं होतं,त्यांचा राजीनामा घेण्यासाठी भाजपच्या महिला रस्त्यावर उतरल्या होत्या.भाजपमध्ये गेल्यानंतर काहीशा अज्ञातवासात केलेल्या चित्रा वाघ पूजा चव्हाण प्रकरणात परत लाईमलाईटमध्ये आल्या.आणि या सगळ्या दबावापुढे अखेर संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता.
त्यामुळे भाजपमध्ये प्रवेशापासून महिला मुद्यांवर सरकारला धारेवर धरणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर भाजपने आता आणखी एक जबाबदारी सोपवली आहे.भाजपा महाराष्ट्र – युवती विभागाच्या प्रभारी म्हणून त्या कसं काम करतात हे पाहावं लागेल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.