HW News Marathi
महाराष्ट्र

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोडांना क्लिनचीट?

पुणे | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले होते आणि त्यानंतर राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण आता या प्रकरणात पुणे पोलिसांनी संजय राठोड यांना क्लीन चिट दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी पुण्यातील वानवडी पोलिसांना जबाब दिला असून त्यात त्यांनी म्हटलं आहे की, आमच्यावर कुणाचाही दबाव नाहीये आणि आमचा कोणावरही आरोप नाही. त्यासोबतच पोलिसांच्या तपासानंतर संजय राठोड यांना क्लीन चिट देण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे. या संदर्भातील अहवालही पुणे पोलिसांनी राज्य सरकारला सोपवला आहे. पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात भारतीय जनता पक्षाने सुद्धा संजय राठोड यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप झाल्याने संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

चित्रा वाघ यांनी दिलं स्पष्टीकरण

भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी या माहितीचे खंडन केले आहे. पुण्यात मुलीच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेता संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीनचीट दिल्याच्या बातम्या येत आहेत तसेच राज्यभरातून फोन ही येत आहेत. या संदर्भात मी स्वत: सकाळी पुणे पोलिस आयुक्तांशी बोलले असता त्यांनी स्वत: या बातमीचं खंडन केलं आहे व यात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.

राठोड यांचे मंत्रिमंडळात कमबॅक?

माजी वनमंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळात समावेशाचे संकेत दिले होते. त्यानंतर आता संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे अशी माहिती मिळतेय .त्यामुळे संजय राठोड हे राज्य मंत्रिमंडळात कमबॅक करणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.संजय राठोड यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त करताना माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील असं सांगितलं होतं.

तर दुसरीकडे आता संजय राठोड मंत्रीमंडळात परततील अशा चर्चा चालु झाल्याने भाजपने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय की , “उद्धव ठाकरे यांनी संजय राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ नये तसं झाल्यास त्यांनी आंदोलनाला तोंड देण्यासाठी तयार रहावं, असा इशारा चंद्राकांत पाटील यांनी दिला होता. मात्र, अद्याप कोणतीही क्लिनचीट न मिळाल्याचं समोर आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…अन् सोनू सूद पोहोचला शरद पवारांच्या भेटीला!

News Desk

जळगाव जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा, रंजना पाटील विजयी

News Desk

1 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व सातबारा मिळणार डिजिटल स्वाक्षरीने – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

News Desk