HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का, चित्रा वाघ भाजपमध्ये करणार प्रवेश ?

मुंबई | राष्ट्रवादीला आणखी मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी काल (२५ जुलै) शिवसेनेने प्रवेश केला. आता या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ देखील राष्ट्रवादीला रामराम ठोकणार असून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ३० जुलैला चित्रा वाघ या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

गेल्या दोन दिवसापासून चित्रा वाघ आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांनी नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती देखील सुत्रांकडून मिळाली आहे. याशिवाय काँग्रेसमधून कालिदास कोळंबकर, सुनील केदार, जयकुमार गोरे, गोपालदास अग्रवाल हे देखील भाजप प्रवेश करण्यासाठी रागेत उभे असल्याची माहिती मिळाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’वर उदयनराजे भोसले आज भूमिका मांडणार

News Desk

शाळांच्या फीमध्ये १५ टक्के कपात!

News Desk

शिवसेनेच्या आमदारांची संपर्क करण्याची कुणाची हिंमत नाही !

News Desk