HW News Marathi
महाराष्ट्र

अबू आझमी यांना ‘त्या’ वक्तव्यावरून चित्रा वाघ यांनी फटकारले

मुंबई | लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या महिलांच्या हेतूविषयी शंका उपस्थित करणारे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी फटकारले आहे. लिव्ह इन म्हणजे सोबत राहणं फक्त, तो शरीरसंबंधांचा परवाना नाही. अबू आझमींना हे माहित नसेल लग्नाची बायकोही नवऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार करू शकते. स्वतःला बायकोचे मालक समजणाऱ्यांना अशा कायदेशीर तरतूदींमागची खोली कशी कळणार, अशी घणाघाती टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

 

काय म्हणाले होते अबू आझमी?

“देशात कायदाच चुकीचा आहे. कायद्यानुसार कुठलीही स्त्री लग्नाशिवाय कुठल्याही व्यक्तीसोबत राहू शकते. लिव्ह इन रिलेशन… व्हॉट इज धीस लिव्ह इन रिलेशनशीप? तर तुम्ही एका महिलेला पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू देता, कुठलाही गुन्हा नाही, वर्षभर एकत्र राहिले आणि नंतर सांगितलं माझा बलात्कार झाला” अशा शब्दात अबू आझमी यांनी संताप व्यक्त केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ आणि ८ सप्टेंबरला होणार

News Desk

लातूरमध्ये टायपिंगच्या परिक्षेत बोगस परिक्षार्थ्यांची हजेरी

News Desk

राज्यातील कोविड परिस्थितीचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Aprna