HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर १५ दिवसानंतर केलेल्या पापाची कबुली द्यायला संजय राठोडची हजेरी – चित्रा वाघ

मुंबई | स्त्रियांवर अत्याचार किंवा त्यांना त्रास देणाऱ्या आरोपीला कुठलीही जात नसते. त्यामुळे शिवसेना नेते संजय राठोड यांच्या मुसक्या आवळून त्यांची चौकशी झाली पाहिजे, असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले. संजय राठोड ज्या समाजाचे आहेत पूजा चव्हाणही त्याच समाजातील होती. आमच्या लेखी जातीला महत्व नाही. बंजारा समाजातील अनेक नेते मला फोन करुन याप्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, असे सांगत असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे.

 

तर, आज (२३ फेब्रुवारी) शिवसेना नेते संजय राठोड पोहरादेवी मंदिरात दर्शनासाठी गेले आहेत. यावरुनही चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. अखेर १५ दिवसानंतर केलेल्या पापाची कबुली द्यायला बंजारा समाजाची काशी पवित्र “पोहरादेवी”मंदिरात पूजा चव्हाणचा हत्यारा संजय राठोडची हजेरी, असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.

तसेच, या आधीही चित्रा वाघ यांनी राठोड यांच्यावर जोरदार टीका केली होती. संजय राठोडच्या पाठराखणीसाठी ३ ही सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची एकत्रीतपणे चढाओढ पहायला मिळाली, असेही त्यांनी म्हटले होते. दरम्यान, संजय राठोड आता पूजा चव्हाण प्रकरणाबद्दल मौन सोडणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भुजबळ यांच्या जामीनावर सुनावणीसाठी मुंबई हायकोर्टचा नकार

News Desk

राज्यातील शाळांना अनुदानासाठी ११६० कोटींच्या खर्चास मंत्रिमंडळाची मान्यता

Aprna

स्टेअरींग अजित पवारांकडे असलं तरी गाड्या आम्ही पुरवतो-संजय राऊत

News Desk