HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई विमानतळावरील सीआयएसएफच्या जवानाला कोरोनाची लागण

मुंबई | मुंबई विमानतळावरील सीआयएसएफच्या जवानाला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी आली आहे. या जवानाला कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ही १८६ वर पोहोचली आहे. जळगावमध्येही १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. तर पुण्यात ४ जणांना लागण झाली आहे. तासागणिक महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याकारणाने राज्याच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे.

राज्यात आज एकूण ३२३ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला, अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ३८१६ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३३९१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर १८१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २६ करोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १७,२९५ व्यक्तींना घरगुती अलगीकरणात असून ५९२८ जण सस्थांत्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैयकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थानप करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी ‘ते’ विधान करायला नको होते !

News Desk

महाराष्ट्र निवडणूक आयोगाद्वारे भाजपाच्या सोशल मिडिया कंपनीचा वापर ? पृथ्वीराज चव्हाण

News Desk

अमरावती हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीसांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

News Desk