HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

आंदोलनाचा प्रतिसाद म्हणजे जनतेच्या मनात सरकारबद्दलचा असंतोष

Chandrakant Patil

मुंबई | विधान परिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (२५ फेब्रुवारी) दुसरा दिवस होता. शेतकऱ्यांची कर्जमाफी असो किंवा महिला सुरक्षेचा प्रश्न भाजप सध्या ठाकरे सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करत आहे. भाजपचे सर्व आमदार मुंबईतील आझाद मैदानात झालेल्या आंदोलनात सहभागी झाले होते. सामान्य जनतेनेही या आंदोलनाला प्रतिसाद दिला. जनतेचा प्रतिसाद पाहत महाविकास आघाडीच्या सरकारचा विरोध केला असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडले.

राज्यभरातून आज ठाकरे सरकारच्या विरोधात आंदोलने झाले. बीड जिल्ह्यातूनही प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लोकांनी आंदोलन केले. तसेच, हिंगणघाट, पुणे येथेही लोकं रस्त्यावर उतरताना दिसली. शेतकऱ्यांचे भले करण्यासाठी हे सरकार आले नसून त्यांची फसवणूक या सरकारने चालवली आहे आणि हाच रोष लक्षात घेत आज लोकं या आंदोलनात सहभागी झाले असल्याचे चेद्रकांत पाटील यांनी सांगितले.

सरकारला धक्का लागेल असे आजचे आंदोलन होते. जनता या सरकारविरोधात आहेत म्हणून ते आज रस्त्यावर उतरले होते. आज संध्याकाळी आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहोत. कोल्हापूरचे भाजप अध्यक्ष समरजीत घाडगे यांनी जिल्ह्यात फिरून राज्यपालांना पत्र लिहिण्याचं लोकांना आवाहन केलं होतं. अशी ५२ हजार पत्र त्यांनी गोळा केली. त्यातली काही पत्र लोकांनी आपल्या रक्ताने लिहिली आहे. यातून लोकांचा सरकारविरोधातील संताप दिसून येतो. ही सर्व पत्र घेऊन समरजीत घाडगे मुंबईत आले आहेत. ही पत्र आम्ही राज्यपालांना सुपुर्द आहोत, अशी माहिती विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Related posts

बँका व वित्तीय संस्था बंद राहणार नाहीत

rasika shinde

Breaking News | चेंबूर मधील बीपीसीएल मध्ये स्फोट

News Desk

Poladpur Bus Accident: आंबेनळी घाट दुर्घटनेत आतापर्यंत २७ मृतदेह बाहेर काढले