HW News Marathi
महाराष्ट्र

लोकसभेत उमेदवार निवडून येण्याचे श्रेय मुख्यमंत्र्यांचे नाही !

मुंबई | “यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामामुळे जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे लोकसभा उमेदवार निवडून आणण्याचे श्रेय इथल्या कोणाला किंवा मुख्यमंत्र्यांना जात नाही”, असे खोचक विधान करत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना टोला लगावला आहे. एकनाथ खडसे हे जळगावमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत बोलत होते. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे हे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अनेकदा खडसे यांनी भाजपला घरचा आहेर देखील दिला आहे.

एकनाथ खडसे यांनी यापूर्वीही १८ जून रोजी विधानसभेत भाजप सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. “गेल्या पाच वर्षात राज्यात सर्वात जास्त कुपोषणाने बालकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर सरकारला कधी जाग येणार”, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला होता. खडसे हे भाजपचे नेते असल्याने सभागृहात सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. खडसेंनी सवाल उपस्थित करत भाजपला घरचा आहेर दिला.

मी राजकीय षडयंत्राचा बळी !

काहीच दिवसांपूर्वी एच.डब्लू,मराठीने या संपूर्ण राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांची खास मुलाखत घेतली होती. यावेळी “पक्षातील लोकांना तुमची भिती वाटते म्हणून तुम्हाला सत्तेपासून दूर ठेवले जात आहे का ?”,असा प्रश्न विचारला असता एकनाथ खडसे म्हणाले की, “भिती वाटण्याचा प्रश्न नाही, ज्याचे त्याचे कर्तृत्त्व असते. मला राजकीय षडयंत्राचा बळी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आता महाराष्ट्राची जनता जाणते. कोणत्याही प्रकारचा गैर व्यवाहार आणि भ्रष्ट्रचार मी आजपर्यंत केल्याचा आरोप सुद्धा झालेला नसताना अचानक आरोप करणे मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देणे, तातडीने राजीनामा मागणे आणि मंत्री मंडळाच्या बाहेर टाकणे हे सर्व एका षडयंत्राचा भाग असल्याचे माझे मत असल्याचे खडसेंनी एच. डब्ल्यूशी बोलताना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ज्या वनामध्ये वाघ संचार करतो, ते वन पर्यावरणीय दृष्टीने समृद्ध असते”

News Desk

राधाकृष्ण विखे पाटलांनी शिवसेनेत यावं, अब्दुल सत्तार यांची ऑफर

News Desk

सांगलीत भाजपला शिवसेनेचा धक्का!

News Desk