मुंबई। ‘कोव्हीशिल्ड’ लशीची निर्मिती करणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या नव्या इमारतीला आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (२२ जानेवारी) दुपारी पुणे येथे सिरमच्या प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. थोड्याच वेळापूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, या आगीत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्या ठिकाणी BCG लशीची निर्मिती केली जाते त्या ठिकाणी आज (२१ जानेवारी) दुपारी २ च्या सुमारास आग लागलेली आहे. इथे नव्या इमारतीचे काम सुरु असताना वेल्डिंगच्या कामादरम्यान ही आग लागली आणि पुढे वाढत गेली. ही आग सद्यस्थितीत विझवण्यात आली असून त्यासाठी २ ते ३ तास लागल्याची माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्या शुक्रवार, २२ जानेवारी रोजी दुपारी पुणे येथे @SerumInstIndia च्या प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 21, 2021
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या पार्श्वभूमीवर मुंबईत थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषदेत घेतली. या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. राजेश टोपेंनी यावेळी दिलेल्या माहितीनुसार, सीरममध्ये ज्या ठिकाणी BCG लशीची निर्मिती होते त्या ठिकाणी ही आग लागली आहे. हा सीरमचा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. इथे बिल्डिंगचे काम सुरू होते. यावेळी वेल्डिंगचे काम सुरू असतानाच स्पार्कमुळे ही आग लागली आणि पुढे वाढत गेली. सद्यस्थितीत ही आग विझवण्यात आली आहे. ही आग नियंत्रणात यायला जवळपास २ ते ३ तास लागले. त्यानंतर पाहाणी दरम्यान या आगीत ५ जणांचे मृतदेह आढळले”, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.