HW News Marathi
Covid-19

राज्यातील लॉकडाऊनवरून आघाडीत बिघाड, मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांत झाली चर्चा

मुंबई | कोरोनामुळे सध्या राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, यामुळे सत्तेत असणाऱ्या महाविकासआघाडीत कुरबुरी वाढत असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडी भक्कम असल्याचे सांगितले जात असले तरी अंतर्गत नाराजी दिसून येत आहेत. निर्णय प्रक्रियेत सगळ्यांना सामावून घेत नसल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनबाबतचा निर्णय परस्पर घेतल्याने आघाडीत नाराजीचे असल्याचे वृत्त आहे. या नाराजीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वर्षा निवासस्थानी ही बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

विश्वासात न घेता लॉकडाऊन वाढवल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे समोर आले होते. ‘मिशन बिगीन अगेन’ची घोषणा करून पुन्हा लॉकडाऊन कायम ठेवल्याबाबत महाविकास आघाडीतल्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. निर्णय घेण्याआधी मंत्र्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचे मत देखील काही मंत्र्यांचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील चौथ्या टप्प्याच्या लॉकडाऊनची नवी नियमावली आजपासून लागू

News Desk

“संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय होणार” अजित पवारांचे बैठकीपूर्वी सूचक विधान!

News Desk

#Coronavirus : जाणून घ्या तुमचा जिल्हा कोणत्या झोनमध्ये आहे?

News Desk