मुंबई | राज्यात कोरोनाचे संकट अजूनही टळत नाही आहे. आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पदही धोक्यात होते. त्यांच्या आमदारकीचा प्रश्न काही केल्या सुटत नव्हता. मात्र, आता केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा केला आहे. विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक घेण्यासाठी आयोगाने परवानगी दिली आहे. निवडणूक आयोगाने २७ मेच्या आधी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Election Commission of India (ECI) grants permission for holding elections to the Legislative Council (MLCs) in Maharashtra. The necessary guidelines will need to be ensured for safety against #COVID19 during the elections pic.twitter.com/teikSwVdyi
— ANI (@ANI) May 1, 2020
शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मागणीनुसार विधान परिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी लवकर निवडणूक घेण्याची विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला केली होती. म्हणजेच मंत्रिमंडळाने दोनदा शिफारस करूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती केली जाणार नाही हे राज्यपालांनी स्पष्ट संकेत दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधिमंडळाच्या उभय सभागृहाचे सदस्य नाहीत. तसेच त्यांची २७ मेपूर्वी निवड होणे आवश्यक असल्याने नऊ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, अशी विनंती राज्यपालांनी निवडणूक आयोगाला केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.