HW News Marathi
महाराष्ट्र

२७ जुलैला मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ‘सामना’तून आता मुख्यमंत्र्यांची मुलाखत होणार प्रदर्शित !

मुंबई | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मॅरेथॉन मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत शरद पवारांनी अनेक विषयांवर दिलखुलास चर्चा केली.

शरद पवारांच्या नंतर आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे.

या मुलाखतीचे चित्रीकरण आज (२० जुलै) पार पडले. राज्य ते केंद्र, राम मंदिर निर्माणाचा मुद्दा, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ते कोरोनाचा प्रादुर्भाव, महाविकास आघाडीचे नेतृत्व ते सरकारचे स्थैर्य अशा अनेक विषयांवर उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत आपली भूमिका मांडली आहे.

२५ आणि २६ जुलैला ‘सामना’ आणि सामानाच्या न्यूज चॅनलवर या मुलाखतीचे प्रक्षेपण होणार आहे. २८ जुलैला उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. आणि वाढदिवसाचे औचित्य साधत संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. त्यामुळे आता नेमकी या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी काय मते मांडली, काय बोलले याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सरकारचे अस्तित्व कुठेच दिसत नाही – देवेंद्र फडणवीस

News Desk

“पूजाने आई-वडिलांचं ऐकलं असतं तर…”, पूजा चव्हाणच्या आजी-आजोबांची प्रतिक्रिया

News Desk

‘माझा वाढदिवस साजरा करू नका’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

News Desk