HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेच्या आमदारांशी बातचीत केल्यानंतर मुख्यमंत्री राष्ट्रवादीच्या आमदारांना भेटणार!

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२८ सप्टेंबर) मुंबईत शिवसेना आमदारांची महत्त्वाची बैठक घेतली होती. यावेळी मुख्यमंत्री आणि आमदारांनी समोरासमोर बसून अनेक प्रश्नांवर चर्चा केली. यात निधीच्या कमतरतेपासून मतदारसंघातील इतर प्रश्नांपर्यंतच्या विषयांवर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या अडचणी समजून घेतानाचा ते प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देखील दिले आहे. शिवसेना आमदार आणि प्रवक्ते सुनील प्रभू यांनी याबाबत माहिती दिली आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या आमदारांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आहेत. या बैठकांमध्ये मुख्यमंत्री आणि आमदारांनी समोरासमोर बसून मतदारसंघातील प्रश्न, निधीची कमतरता या प्रश्नांबद्दल चर्चा केली. पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे आमदार उपस्थित होते. यावेळी विकास कामांबद्दल चर्चा करण्यात आली.

“शिवसेनेचे आमदार उपस्थित होते. यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनाही मुख्यमंत्री भेटणार आहेत. आमदार हतबल नाहीत, तर संतुष्ट आहेत. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या आमदारांना भेटून त्यांच्या कामाच्या संदर्भातला आढावा घेऊन आवश्यक आदेश देत आहेत,” असेही सुनील प्रभू यांनी सांगितले आहे.

यावेळी सुनील प्रभू यांनी संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात बैठकीत कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान, याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने विदर्भातील शिवसेना आमदारांची वर्षा निवासस्थानी बैठक घेतली होती. मतदारसंघ, जिल्हा आणि विदर्भातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने यावेळी चर्चा केली होती. शिवसेना आमदार संजय राठोड यांनी स्वतः याची माहिती दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रश्नावर मंत्र्यांचे उत्तर असमाधानकारक; विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केला सभात्याग

Aprna

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची थेट कर्ज योजनेची मर्यादा १ लाख रूपयांपर्यंत वाढवली

Aprna

राष्ट्रपती निवडीनंतर राज्यात शिवसेनेला सत्तेतून डिच्चू ?

News Desk