HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होणार आहे. साधारणतः आज (२३ ऑक्टोबर) सकाळी १० च्या सुमारास या खंडपीठाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होईल. जवळपास गेल्या महिन्याभरातील मुख्यमंत्र्यांचा हा दुसरा औरंगाबाद दौरा आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री या दौऱ्यादरम्यान नेमकं काय बोलणार? याकडेही सर्वांचं लक्ष आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याआधी १७ सप्टेंबर रोजी औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यानंतर, आता ३६ दिवसांनी पुन्हा ते औरंगाबादला गेले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय कायदे व न्याय मंत्री किरण रीजीजू , सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन.व्ही रमण्णा, पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार इम्तियाज जलील, मंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे विविध लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारीही असतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पांडुरंगाच्या ” रिंगण ” सोहळ्यासाठी एस.टी.च्या जादा बसेस

News Desk

हे सरकार आपल्याच आमदारांना घाबरत असल्याचं दिसत आहे- देवेंद्र फडणवीस

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांचे अजून किती बळी सरकारला हवेत? दरेकरांचा ठाकरे सरकारला सवाल

News Desk