HW News Marathi
महाराष्ट्र

“चंद्रशेखर बावनकुळे कोणत्या पक्षाचे आहेत?”, राऊतांचा खोचक सवाल

मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीपासून शिवसेना अलिप्त असल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पडदा पाडला आहे. पवारांकडे होणारी बैठक विरोधी पक्षाची बैठक नाही. ही बैठक राष्ट्रमंचच्या नेत्यांची आहे. तेवढंच या बैठकीला महत्त्व आहे. त्यामुळे बैठकीला जाण्याचा प्रश्नच येत नाही, असं सांगतानाच काँग्रेस आणि शिवसेनेशिवाय तिसरी आघाडी होऊ शकत नाही, असा दावाही संजय राऊत यांनी केला. आज (२२ जून) मुंबईत पत्रकारांशी ते संवाद साधत होते.

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी थेट पत्रकारांना बावनकुळे कोणत्या पक्षाचे आहेत? असा उलट प्रश्न विचारला. यावर पत्रकारांनी भाजपचे आहेत असं म्हटल्यावर अच्छा भाजपचे आहेत का मला माहित नव्हतं असं म्हणत खिल्ली उडवली. इतकंच नाही कर यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही टार्गेट केलं. शरद पवार आणि शिवसेना सत्तेत एकत्र आहेत हे ते विसरतात. पवार-शिवसेना एकत्र असल्यामुळेच तुम्ही सत्तेच्या बाहेर आहात. अर्थात तुमचं हे दु:ख समजू शकतो, असा चिमटा त्यांनी चंद्रकांत पाटील यांना काढला.

काय म्हणाले होते चंद्रशेखर बावनकुळे?

प्रताप सरनाईकंच नाही, तर शिवसेनेचे ९० टक्के आमदार, खासदार सरकारवर नाराज आहेत. सरकारमध्ये फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचीच कामं होत आहेत. काँग्रेस – राष्ट्रवादी आपला पक्ष मजबूत करतायत, शिवसेना कमजोर होत आहे. यामुळे शिवसेनेचे खासदार आणि आमदार या सरकारवर नाराज आहेत. वीज कापल्याने शिवसेना आमदारांवर लोकांचा रोष कायम आहे. त्यामुळे शिवसेना- भाजप पुन्हा एकत्र आले तर नवल वाटायला नको, असा गौप्यस्फोट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निर्बूद्ध नागरिकंचा मोर्चा

News Desk

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल झालेला फॉर्म बनावट

swarit

संजय राऊत आणि निवडणूकीचा काहीही संबंध नाही, निलेश राणेंचा प्रहार

News Desk