मुंबई | मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (८ जून) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी गेले आहेत. दिल्लीत मुख्यमंत्री दाखल झाले असून मुख्मंत्र्यांचा ताफा पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी रवाना झाला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण,राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे त्यांच्यासोबत असतील.
सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक होईल. कोरोनाशी सामना करत असताना राज्य सरकारला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळोवेळी पत्र लिहून अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. पण आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. त्यामुळेही या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. या भेटीत प्रामुख्याने मराठा आरक्षणावर तर चर्चा होईलच पण तौक्ते चक्रीवादळ मदत, जीएसटी थकबाकी या विषयांवर देखील चर्चा होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Maharashtra CM Uddhav Thackeray arrives at Delhi's IGI Airport, ahead of his meeting with PM Modi today
A delegation of state government led by CM Thackeray & Deputy CM Ajit Pawar will meet PM to discuss issues like Maratha reservation, OBC reservation, and cyclone relief pic.twitter.com/mdVn13OTtS
— ANI (@ANI) June 8, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.