HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात शिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याच्या तयारीला लागा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई | राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीत अनेक विषयांवरुन वाद विविध सुरुच आहेत. भाजप वारंवार आघाडी सरकार पाडण्याच्या गोष्टी करत आहे. तर कधी स्वत:हून हे सरकार पडेल असे म्हणत आहे. यावरुन आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिल्याची माहिती आहे. शिवसेना जिल्हाप्रमुखांसोबत काल रात्री उशिरा पार पडलेली व्हिडीओ कॉन्फरन्स बैठक तब्बल बराच काळ सुरु होती.

यंदा कोव्हिडच्या काळात राज्य सरकारकडे निधीची कमतरता असली तरी पुढच्या वर्षी जिल्ह्यांना विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना दिले. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून जनतेशी ऑनलाईन संवाद साधला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, राज्यातली महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या गोष्टी काहीजण करत आहेत. त्यासाठी तारीख पे तारीख देत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी सरकार पाडून दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं. आम्ही गुळाला चिकटलेले मुंगळे नाहीत. महाराष्ट्र हा लेच्या पेच्यांचा प्रदेश नाही, हे वाघांचं राज्य आहे. जो महाराष्ट्रच्या हिताच्या आडवा येईल त्याला आडवा पाडून गुढी उभी करणार असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनवरुन राज्य सरकारमध्ये थोडेसे मतभेद असले तरी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहोत

News Desk

काल मुख्यमंत्री दानवेंना म्हणाले, आमचे भावी सहकारी, आज जयंत पाटील-देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत!

News Desk

‘राज ठाकरेंच्या वक्तव्याला चंद्रकांत पाटलांचा दुजोरा!’

Jui Jadhav