HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्राला २० कोटी लसींची गरज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अदार पुनावालांशी चर्चा

मुंबई | देशातील कोरोना रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. यामुळे लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जाणार आहे. आत्तापर्यंत ६० वर्षांवरील आणि ४५ वर्षांवरील सगळ्यांना लस दिली जात होती. मात्र आता केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्व नागरिकांनाही कोरोनाची लस देण्याची मुभा दिल्यानंतर आता ठाकरे सरकारने सिरम इन्सिट्यूटकडून कोव्हीशिल्ड लस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच सिरमचे प्रमुख अदर पुनावाला यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राला २० कोटी लसींची गरज आहे. १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाची मुभा दिल्यामुळे ५.५ कोटी लसीची गरज नव्याने निर्माण झाली आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी अदर पुनावाला यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यामुळे आता सीरम महाराष्ट्राला किती वेगाने लसी उपलब्ध करुन देणार, हे पाहावे लागणार आहे.

सध्या कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रातील अनेक लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. अशातच आता केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार प्रत्येक राज्याला ५० टक्के लसींचा साठा हा थेट लसनिर्मात्या कंपन्यांशी बोलणी करुन विकत घ्यावा लागणार आहे. त्यादृष्टीने आता महाराष्ट्र सरकारने पावले टाकायला सुरुवात केली आहे.

केंद्र सरकार कोरोना लसींच्या वाटपात दुजाभाव करत असल्याचा आरोप महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून अनेकदा करण्यात येतो. आता १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला मुभा दिल्यानंतर केंद्र सरकारने 50 टक्के लसींचा साठा खरेदी करण्याची जबाबदारी राज्यांवर टाकली आहे. त्यामुळे आता राज्यांना कोव्हीशिल्डचे उत्पादन करणारी सिरम आणि कोव्हॅक्सिन लस तयार करणाऱ्या भारत बायोटेकशी थेट बोलावे लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण

Aprna

जून महिन्यात १२ कोटी लस उपलब्ध होणार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती

News Desk

मुंबईत कोरोना संसर्ग वाढत असला तरी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय नाही – सुरेश काकाणी

News Desk