HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची अडवली गाडी, नार्वेकर म्हणाले, “चला यांना गाडीत टाकून शिवबंधन बांधू”!

मुंबई | राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनावरून महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष आमनेसामने आले आहेत. कोरोनाचा बहाणा पुढे करून पावसाळी अधिवेशन टाळण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. विरोधी पक्षनेते सरकारवर जोरदार हल्ला चढवत असताना विधिमंडळ परिसरात मात्र भाजपचे इतर नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये उत्तम संवाद पाहायला मिळाला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानभवनातून बाहेर पडत असतानाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड आणि गिरीश महाजन यांनी त्यांची गाडी अडवली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही गाडी थांबवली. त्यांचं निवेदन स्वीकारलं आणि त्यांच्याशी गप्पाही मारल्या. मुख्यमंत्र्यांची गाडी बाहेर पडत असतानाट विधानभवनाबाहेरच उभ्या असलेल्या प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि गिरीश महाजन या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही गाडी थांबवली. यावेळी या तिन्ही नेत्यांनी त्यांच्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं. मुख्यमंत्र्यांनी हे निवेदन घेतलं. त्यावरून नजर फिरवली आणि विरोधकांशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या.

गाडीत एकालाच प्रवेश मिळणार

गप्पागोष्टी झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जायला निघाले. तेव्हा तिघांनीही आम्हाला तुमच्या गाडीत घ्या, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली. त्यावर एकालाच गाडीत प्रवेस मिळेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर या तिघांनीही दिलखुलास हसून त्याला दाद दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा विधानभवनातून बाहेर पडला होता.

या शिवबंधन बांधून टाकूयात

भेट घेत असताना मागच्या गाडीतून शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर खाली उतरले आणि थेट मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ आले. त्यानंतर मिलिंद नार्वेकरांनीही विरोधी पक्षनेत्यांशी गप्पा मारताना त्यांना कोपरखळया लगावल्या आहेत.

नार्वेकर आणि दरेकरांमधील संवाद

मिलिंद नार्वेकर :- उद्धव साहेब, यांनी तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे का?

प्रविण दरेकर :- आम्ही केव्हाही येऊ शकतो.

मिलिंद नार्वेकर :- यांना आताच गाडीत या, शिबबंधन बांधूया.

प्रविण दरेकर :- आम्ही केव्हाही एकत्र येऊ शकतो, हे आमचं मूळ आहे.

२ दिवसांचे अधिवेशन

दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी 5 व 6 जुलै या दोन दिवसाचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनाच्या प्रांगणात झाली. या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, मंत्रीमंडळातील सदस्य, विधानपरिषद आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, संसदीय कार्य विभागाचे सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.

प्रताप सरनाईकांचा लेटर बॉम्ब

भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमधील व्यक्तीगत सलोखा विधिमंडळ परिसरात पाहायला मिळाला. दोनच दिवसांपूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना लिहिलेलं पत्र समोर आलं असताना शिवसेना आणि भाजपमधील हा सलोखा पाहायला मिळाला. भारतीय जनता पक्षासोबतची युती तुटली असली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. ते अजून तुटण्याच्या आधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल, अशा आशयाचं पत्र सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. हे पत्र समोर येताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय?”, सेनेचा मोदी सरकारला सवाल

News Desk

राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित

swarit

नागपूरमध्ये रुग्णालयाला भीषण आग

News Desk