HW News Marathi
महाराष्ट्र

मिठागरात मिठाचा खडा टाकू नका, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा

मुंबई | मुंबई मेट्रोची कारशेडला कांजूरमार्गला करण्यावरुन राज्य सरकारवर टीका केली जात आहे. या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे. “कांजूरमार्गची जमीन मिठागराची आहे असे म्हणणाऱ्यांनी मिठागरात मिठाचा खडा टाकू नका,” असा टोला विरोधकांना उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. तसेच “मुंबईकरांच्या हितासाठी कोणत्याही टीकेची पर्वा न करता काम करणार,” असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले आहे.

महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी केलेलं महाराष्ट्राच्या बदनामीचं कारस्थान हे तोडून मोडून आपण उधळून लावलं आहे. आपण सगळे करोनाशी लढा देत असताना, संकटाशी लढत असताना महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी होय मी हा शब्द मुद्दाम वापरतो आहे, बदनामीचा कट केला होता. महाराष्ट्रात कायदा सुव्यस्था कोलमडली आहे, इथे अंमली पदार्थांची शेती होते आहे असं चित्र निर्माण केलं. मात्र त्यांचं हे कारस्थान आपण उधळून लावलं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

काहीजण ती जमीन मिठागराची आहे, असं म्हणत आहेत, पण ती जर मिठागराची जमीन आहे, असे म्हणणाऱ्यांना एक कळत तुम्ही मुंबईकरांच्या प्रोजेक्टमध्ये मिठाचा खडा टाकत आहात. आरेची कारशेड कांजूरमार्गला नेली त्यावर सर्व उत्तर आपल्याकडे आहेत. हे सर्व जे टीका करतात त्यांना समर्पक उत्तर देऊ,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मिठाच्या खड्याचा इलाज काय करायचा तो आम्ही करु. पण आम्ही सुद्धा डोळे बंद करुन काही काम करत नाही. जे काही मुंबईकरांच्या हिताचे असेल ते टीकेची पर्वा न करता ते करणार म्हणजे करणारचं. कोणत्याही परिस्थिती करु,” असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे.

“मेट्रोसाठी जर्मनीच्या के. एफ. डब्ल्यू या कंपनीकडून ५४५ दशलक्ष युरो एवढ्या रकमेचं कर्ज अत्यंत माफक दरात घेतलं आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. याचे जे काही जर्मन अधिकारी आहेत त्यांनी महाराष्ट्रात खूप सोईचे वाटते. ते महाराष्ट्राच्या विकासासाठी सोबत आहेत,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा पॅटर्न ठरला! 

News Desk

मानवी मनोरे न रचण्याचा सरकारचा आदेश!

News Desk

आंबिल ओढ्यातील नागरिकांशी संवाद, सुप्रिया सुळेंसमोरच अजित पवार मुर्दाबादच्या दिल्या घोषणा

News Desk