HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र मुंबई राजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याच्या मोदींच्या निर्णयाचे मानले आभार!

नवी दिल्ली | कोरोना लसीकरणाचा मोठा टप्पा पार होणार आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. १ मे पासून कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होणार आहे. १८ वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला.यापूर्वी सर्वात आधी ६० वर्षांवरील ज्येष्ठांना लस दिली जात होती. त्यानंतर १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आता १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना कोव्हिड १९ लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत.
काय म्हणाले उध्दव ठाकरे?
आज केंद्र शासनाने १८ वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करून आपल्या मागणीचा विचार केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.
राज्यात या अनुषंगाने पूर्ण नियोजन केले जाईल व लसीचा पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी देशातील २५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून तसा निर्णय घेण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती.

 

Related posts

राज्यातील ३५ हजार कैद्यांपैकी, १७ हजार कैद्यांची तात्पुरती कारागृहातुन सूटका

News Desk

धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी ताबडतोब करावी, पडळकरांची सरकारकडे मागणी

News Desk

भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी जे.पी.नड्डा यांची नियुक्ती

News Desk