HW News Marathi
Covid-19

मुंबईकरांसाठी परदेशातून लसी मागवण्यासंदर्भात हालचाली सुरु – आदित्य ठाकरे

मुंबई | मुंबईमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींची पुरेशी उपलब्धता होण्याच्या दृष्टीने जागतिक पातळीवर खरेदी करण्याच्या अनुषंगाने शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला देण्यात आल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

शहरातील लसीकरण वेगाने आणि परिणामकारक होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी या यासंदर्भात चर्चा केल्यानंतर महापालिकेला सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, सध्या कोरोना प्रतिंबधक लसीसाठी स्मार्टफोनद्वारे संबंधीत ॲपवर नोंदणी करावी लागते. पण या तंत्रज्ञानाची माहिती नसलेले नागरिक तसंच जे कोविन अॅप ऑपरेट करू शकत नाहीत अशा नागरिकांनाही लस सुलभरित्या मिळावी याकरिता एक पद्धती तयार करण्यावर देखील आम्ही काम करत आहोत.

याशिवाय मुंबईची लसींची अधिकची गरज पाहता शहरात लसीकरण केंद्र वाढविण्याचे आमचे प्रयत्न सतत चालू आहेत. आपल्या विनंतीनंतर मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यासह शहरातील प्रत्येक पालिका झोनमध्ये एक ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी घेतला आहे, असं ठाकरे म्हणाले आहेत.

यासंदर्भात तातडीने अंमलबजावणी झाल्याने आता शहरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढली आहे. शिवाय ड्राईव्ह-इन लसीकरण मोहीमेमुळे ज्येष्ठ नागरिकांना लस सुलभरित्या मिळण्यासाठी मदत होत आहे, असं आदित्य यांनी सांगितलं आहे. गृहनिर्माण सोसायट्या आणि रुग्णालयांच्या सहभागातून सोसायटी कॉम्प्लेक्समध्ये लसीकरण राबविण्याच्या धोरणासाठी मार्गदर्शक सूचनाही महापालिकेने जारी केल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘लसीकरण केंद्रावर खासदार राजन विचारेंकडून कार्यकर्त्याला मारहाण’

News Desk

राज्यभरात आतापर्यंत १० हजार ३१८ रुग्ण बरे होऊन घरी, एकूण रुग्ण ३९ हजार २९७ वर

News Desk

चिंताजनक : राज्यात आज कोरोना रुग्णांचा उद्रेक!

News Desk