HW News Marathi
देश / विदेश

राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर मांडला

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज (११ ऑगस्ट) बातचीत केली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या चर्चेत भाग घेतला होता. उद्धव ठाकरे यांनी यावेळी अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मुद्दा उपस्थित केला. अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत देशपातळीवर एकच निर्णय व्हावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली.

“विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांचा जीव धोक्यात घालता कामा नये. त्यामुळे अव्यावसायिक कोर्सेसच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा घेऊ नयेत. विद्यार्थ्यांना सरासरी मार्क्स देऊन उत्तीर्ण करावे. कोरोनामुळे किती काळ असे राहणार याचे उत्तर नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य किती काळ टांगून ठेवणार. यासाठी देशपातळीवर एकच निर्णय लवकरात लवकर घेण्याची आवश्यकता आहे,” असे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता असून विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार, मौखिक स्वरूपात परीक्षा घेण्याची गरज आहे. अंतिम वर्षाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर कोरोना युद्धात त्यांच्या इच्छेनुसार मदत घेता येईल,” असेही उद्धव ठाकरे यांनी सुचवले. राज्यात कोरोना उपचारासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि इतर सुविधांसह सज्ज अशा साडेतीन लाख खाटा उपलब्ध असल्याचे सांगतानाच या सुविधांसाठी डॉक्टर, नर्से, कर्मचारी यांची गरज असल्याचे उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओबीसी आरक्षणासाठी केंद्राने एम्पिरिकल डेटा द्यावा; सुप्रिया सुळेंची मागणी

News Desk

महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच ‘हे’ सगळं सुरु, नवनीत राणांचा गंभीर आरोप 

News Desk

सुपरस्टार रजनीकांत यांचे राजकारणात पदार्पण, लवकरच पक्ष स्थापन करणार!

News Desk