HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री पुन्हा एकदा घेणार श्रीरामांच दर्शन

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या दौऱ्यावर आहेत. काल (२१ फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्या या भेटीत राज्याच्या हिताबद्दल अनेक गोष्टींवर चर्चा झाली. दरम्यान, उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येला भेट द्यायला जाणार असल्याची माहिती येत आहे. ७ मार्चला उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत अयोध्येला जाणार असून प्रभू रामचंद्राचे दर्शन घेणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (२२ फेब्रुवारी) ट्विटरद्वारे पोस्ट शेअर करत दिली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची सविस्तर माहिती दिली आहे. येत्या ७ मार्च रोजी उद्धव ठाकरे असंख्य शिवसैनिकांना सोबत घेऊन अयोध्येला जाणार आहेत. त्याचदिवशी ते अयोध्येत दुपारी श्रीरामाचे दर्शन घेतील. त्यानंतर संध्याकाळी शरयू नदीच्या तीरावर महाआरती करतील. त्यामुळे या ऐतिहासिक सोहळ्यात सामील व्हा, असे जाहीर आवाहनही राऊत यांनी ट्विटरद्वारे केले आहे. काल मुख्यमंत्री ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह , भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर लगेचच मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याचे ट्विट करून भाजपला धक्का दिला आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंपाऊंडरला सतत चर्चेत राहायची भूक, संजय निरुपमांचा  राऊतांना अप्रत्यक्ष टोला

News Desk

राज्यातल्या प्रोड्यूसर्संना मुख्यमंत्र्यांनी दिल्या विशेष सूचना!

News Desk

मातोश्री पाणंद रस्ते व रोहयोची कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करावीत! – संदिपान भुमरे

Aprna