HW News Marathi
महाराष्ट्र

१२ कोटी लस उपलब्ध झाले तर एकरकमी विकत घ्यायची राज्य सरकारची तयारी !

मुंबई | राज्यातील एकूण कोरोनास्थिती तसेच उद्यापासून देशभरात सुरु होणाऱ्या लसीकरणावर मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज (३० एप्रिल) फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. उद्या (१ मे ) महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी या संवादला सुरुवात केली.

यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की मागच्या वेळीचा महाराष्ट्र दिन लॉ़कडाऊनमध्ये गेला. यावर्षीही तशीच परिस्थिती आहे. दरम्यान, राज्यातील रुग्णवाढ स्थिरावली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले असून ठाकरे सरकार कोरोनाच्या या कठीण काळात काय काय करत आहेत या बद्दलही सविस्तर माहिती दिली आहे.

तसेच, उद्यापासून म्हणजेच १ मे महाराष्ट्र दिनापासून १८ ते ४४ या वयोगटाच्या सगळ्यांच्याच लसीकरणाला सुरुवात होणार आहे. केंद्राकडून लसीचा साठा येत आहे. आणि जसजशी लस उपलब्ध होत राहील तशी ही संख्या वाढवणार आहोत. यावेळी उद्धव ठाकरेंनी लसीकरण सेंटरला कोविड सेंटर करु नका अशी विनंतीही केली आहे. पुढे ते असंही म्हणाले की, ही पहिली लस आहे शेवटची नाही. त्यामुळे संय्यम बाळगण्याची विनंतीही केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे :

* मे महिन्यात १८ लाख डोस मिळणार. ६ कोटी नागरिकांना १२ कोटी डोसची गरज

* जसजशी लस उपलब्ध होतील त्याप्रमाणे उद्यापासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण सुरू करणार

* राज्यासाठी लसीकरणाचे वेगळे App तयार करण्याची केंद्राकडे विनंती केली आहे.

* उद्यापासून पहिली लस दिली जाईल शेवटची नाही.

* केंद्राने राज्याला लसीकरणाची जी जबाबदारी दिली ती पेलायला राज्य समर्थ

* जसजशी लस उपलब्ध होतील तसतशी वाढवत जाऊ.

* आज आपल्याकडे ३ लाख लसी आलेल्या आहेत पण आकडा फारच तुटपुंजा

*कोरोनात राजकारण आणणार नाही.

*राज्यात रोज १० लाख लसीकरण करू

*लसीकरण केंद्रावर गर्दी करू नका.

*लग्न समारंभ शिस्तीने पार पाडा

* नाशिक, विरारच्या दुर्घटनांनी तिथे आरोग्य कर्मचारी हताश झाले.

* शिवभोजन थाळी मोफत झाल्यानंतर १५ लाखांहून अधिक जणांनी स्वाद घेतला

* 7 कोटी लाभार्थ्यांना मोफत गहू, तांदूळ वाटप सुरू

* कुठेही आपण थांबलेलो नाही, कमी पडत नाही.

* संपूर्ण जगात कोरोनाच्या लाटा येत आहेत. महाराष्ट्रात तज्ञांच्या म्हणण्यानुसार तिसरी लाटही येणार.

* तिसरी लाटेला तोंड देण्यासाठी सरकारने आता कंबर कसली आहे.

* तिसऱ्या लाटेसाठी काय तयारी अपेक्षित याबाबत आम्ही सूचना केल्या आहेत. आपण ती लाट थोपवूच

* १ कोटी ५८ लाख लोकांचे राज्यात लसीकरण पूर्ण

* लसीकरण, चाचण्या, आरोग्यव्यवस्थेत आपण कदाचित देशात पहिल्या क्रमांकावर असू मात्र दुर्दैवाने कोरोनावाढीतही आपण सर्वात पुढे.

* पंतप्रधानांनी आपल्या २ मागण्या मान्य केल्या. आपण आभारही मानले आहेत.

* १२ कोटी डोसांची गरज. पुरवठा होत असेल तर एक रकमी एका चेकमध्ये आपण विकत घेऊ. तेवढी राज्य सरकारची तयारी आहे.

* जिल्हाधिकाऱ्यांना हॉस्पिटलमध्येच ऑक्सिजन प्लांट्स उभारण्याचे आदेश

* हे प्लांट्स उभारले की तिसरी लाट जरी आली तरी ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही.

* ऑक्सिजन प्लांट्सच्या शेजारी कोविड सेंटर्स उभे करण्याचा विचार

* अजूनही काही दिवस असाच संयम आणि निर्बंध पाळावा लागेल.

* रोज पावणे तीन लाख कोरोना चाचण्या

*कोविड सेंटरचे स्ट्रॅक्चरल ऑडीटचे आदेश

* काही दिवसांत २७५ ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित होतील. काही ठिकाणी काम सुरू.

* ज्या जम्बो कोविड सेंटर्सची उभारणी केलीये तिथे स्ट्रक्चरल फायर ऑडिट करा. दुर्घटना टाळण्याच्या हेतूने काम करा

* गेल्या वर्षी राज्यात कोरोनाने शिरकाव केला तेव्हा फक्त २ चाचणी केंद्रे होते आताच्या घडीला 600 च्या पुढे चाचणी केंद्रे आहेत.

* लॉकडाऊन केले तरीही आपण सातत्याने आरोग्यसुविधा वाढवत आहोत.

* राज्याचे हित साधले जात असेल तर इतरांचेही अनुकरण करू

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माळीणमधील नागरिकांनी उद्ध्वस्त तळीये गावासाठी दिली 25 हजाराची मदत….!

News Desk

“मोदींची मूर्ती हटवल्याने चक्क राष्ट्रवादी नेत्यांकडून आंदोलन”

News Desk

शेतकऱ्यांनी दाखवलेल्या एकजुटीचा अखेर विजय – छगन भुजबळ

News Desk