सिंधुदुर्ग | शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकेची टांगती तलवार असतानाच आता पुन्हा एकदा त्यांना धक्का बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीसाठी आज (३० डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र, नितेश राणेंना त्यांचा मतदानाचा हक्क नाकारण्यात आला आहे. १६ कोटींच्या थकीत कर्जामुळे नितेश राणेंविरोधात सहकार विभागाकडून हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यमध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच मतदानाच्या पूर्वसंध्येला सहकार विभागाने भाजप प्रणित पॅनलला नितेश राणेंचा मतदानाचा हक्क नाकारल्याने मोठा झटका दिला. नितेश राणे ज्या संस्थेचे सदस्य आहेत, त्या सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाने जिल्हा बँकेकडून १६ कोटी रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड न केल्यामुळे सहकार विभागाने नितेश राणेंचा मतदानाचा हक्क नाकारला असल्याचे कारण त्यांनी दिले आहे.
अटक की जामीन ?
दरम्यान, दुसरीकडे नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवली आहे. संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असून काल (२९ डिसेंबर) त्यावर सुनावणी पार पडली. सरकारी वकील आणि नितेश राणेंच्या वकिलांमध्ये न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला. यावेळी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून नितेश राणेंना अटक होणार की जामीन मिळणार, हे आज कळेल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.