HW News Marathi
महाराष्ट्र

कोचिंग क्लास पुन्हा सुरू करण्यासाठी शिष्टमंडळ राज ठाकरेंची भेट घेणार

मुंबई | राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही गोष्टी सुरू झाल्या आहेत मात्र काही गोष्टी या सरकारकडे मागणी करूनही सुरू होत नाही आहेत. त्यामुळे लोकं आपल्या समस्या घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे जात आहेत. आता राज्यातील ग्रंथालय सुरु झाल्यानंतर आता कोचिंग क्लास पुन्हा सुरु करण्यासाठी मालक चांगलेच आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पालक संघासह कोचिंग क्लासेसच्या पालक आणि शिक्षकांचे शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. कोचिंग क्लासेसच्या सर्व मागण्या राज ठाकरेंनी सरकार दरबारी मांडाव्या यासाठीही भेट घेणार आहेत.

राज्यात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अकरावीसह इतर इयत्तांचे प्रवेश रखडले आहेत. तर दुसरीकडे आर्थिक परिस्थितीमुळे कोचिंग क्लास मालकांचे कंबरडे मोडले आहे. या पार्श्वभूमीवर आज पालक संघ आणि कोचिंग क्लासेस मालक – शिक्षकांचे शिष्टमंडळ राज ठाकरेंची भेट घेणार आहे. राज ठाकरेंच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर ही भेट होणार आहे. कोचिंग क्लासचे शिष्टमंडळ त्यांच्या काही मागण्या राज ठाकरेंकडे मांडणार आहेत. या मागण्या सरकार दरबारी मांडण्यासाठी हे शिष्टमंडळ राज ठाकरेंकडे विनंती करणार आहेत.

या आधी डबेवाले, जिम चालक- मालक, ग्रंथालयाचे शिष्टमंडळ, कोळी महिला, पुजारी, वीज ग्राहक या सगळ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. आणि काही मागण्या मान्य झाल्या होत्या. तर काही अजूनही प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे यावरही राज ठाकरे काय पाऊल उचलणार? मागण्या पूर्ण होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोथरूडमध्ये लवकरच उभारणार ग.दि. माडगूळकर यांचे स्मारक

Gauri Tilekar

लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन

Manasi Devkar

‘केंद्रसरकारकडून महाराष्ट्राला लसपुरवठा होत नसल्याने लसीकरणाची केंद्रे बंद करावी लागतायत’ – नवाब मलिक

News Desk