HW News Marathi
Covid-19

Weekend Lockdown मध्ये आमदार रवी राणांकडून नियमांचे उल्लंघन, उद्घाटन कार्यक्रमाला तोबा गर्दी

अमरावती | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत काही अंशी कोरोना रूग्ण कमी आढळत असले तरी धोका अजूनही आहेच. दरम्यान, आता कुठे दुसरी लाट ओसरत असताना डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या विषाणूने चिंता वाढवली आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता अनेक जिल्ह्यांत कठोर निर्बंध लागू करण्यात आले असून वीकेंड लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. या वीकेंड लॉकडाऊनमध्ये चक्क आमदार रवी राणा यांच्याकडूनच नियमांचे उल्लंघन झाल्याचं समोर आलं आहे.

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा हे अनेकदा कोरोना प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेले नियम पायदळी तुडवतांना दिसून आले आहेत. आज पुन्हा एकदा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत आमदार राणा यांनी अमरावती शहरातील राजापेठ परिसरातील भुयारी मार्गाचे उद्घाटन केले. यावेळी तोबा गर्दी झालेली पाहायला मिळाली. दरम्यान, राज्य सरकारने कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम करण्यास नकार दिला असताना नेत्यांकडून, मंत्र्यांकडून नियम मोडण्याचे प्रकार समोर येत आहेत.

अमरावतीत हा भुयारी मार्ग आजपासून सामान्य जनतेसाठी खुला केला. मात्र यावेळी रवी राणा यांनी शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी जमवली होती. एकीकडे जिल्ह्यात कोरोना नियमांच पालन करण्यासाठी प्रशासन वीकेंड लॉकडाऊनसह कडक निर्बंध लावत असताना लोकप्रतिनिधींकडूनच कोरोना नियमांच पालन होत नसेल तर सामान्य जनता काय करणार असा प्रश्न निर्माण होत आहे.

आमदार रवी राणा यांच्यावर कारवाई होणार?

आमदार रवी राणा यांनी केलेल्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्यांनी स्वत: चेहऱ्यावर मास्क लावलेला नसल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. सर्वसामान्य नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येते. आता आमदार रवी राणा यांनीच नियम पायदळी तुडवल्याने त्यांच्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात कोरोनाचा आकडा २१५, तिसऱ्या स्टेजमध्ये जाण्याचं सरकारसमोर संकट !

Arati More

मुंबईप्रमाणेच प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स नेमण्यात येणार – अमित देशमुख

News Desk

#Lockdown5 : कंटेन्मेंट झोनमध्ये सर्व बंद, तर केंद्र सरकार टप्प्याटप्प्याने सूट देणार

News Desk