HW News Marathi
महाराष्ट्र

हंगामी अध्यक्ष पदावरून काँग्रेस-भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चुरस

मुंबई । “राज्यात उद्याच बहुमत चाचणी होणार,” असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज (२६ नोव्हेंबर) दिला आहे. मात्र, “उद्या (२७ नोव्हेंबर) सायंकाळी ५ वाचपर्यंत सर्व आमदारांचा शपथविधी झाला पाहिजे,” असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. या बहुमत चाचणी करण्यात होणार मतदान हे उघड पद्धतीने होणार असून या मतदानाचे लाईव्ह टेलिकास्ट करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. बहुमत चाचणीसाठी हंगामी अध्यक्षांची (प्रोटेम स्पीकर) नियुक्ती करा, असे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत.

विधानसभेत सर्वाधिक काळ निवडून गेलेल्या नेत्यांची नियुक्ती हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. यात या पार्श्वभूमीवर हंगामी अध्यक्षपदासाठी १७ विधानसभा सदस्यांची नावे सचिवालयाकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुपूर्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात ८ वेळा निवडून विधानसभेवर गेले आहेत. तर माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे सलग चार वेळा निवडून गेले आहेत. तसेच भाजपच्या वतीने सहा वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आमदार बबनराव पाचपुते यांचे हंगामी अध्यक्षांच्या शर्यतीत आघाडीवर या तिघांचे नाव आहे.

हंगामी अध्यक्षपदासाठी असलेली १७ आमदारांची नावे

यामध्ये माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सर्वाधिक वेळा आमदार राहिलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, बबनराव पाचपुते, जयंत पाटील, छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, के.सी पाडवी, कालिदास कोळंबकर, सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गोवर्धन शर्मा, हितेंद्र ठाकूर, प्रकाश भारसाखळे, मंगलप्रभात लोढा, बबनराव शिंदे यांच्या नावाचा समावेश आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकराचा अधिवेशनातून पळ, लोकशाहीचा कुलुप ! फडणवीस भडकले

News Desk

संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करा; पेगॅसस प्रकरणी शिवसेनेची मागणी

News Desk

‘वर्षा’वर देवेंद्र फडणवीसांच्या सामानाची बांधाबांध सुरू

News Desk