HW News Marathi
महाराष्ट्र

सामनाच्या संपादक रश्मी ठाकरेंविरोधात नाशिक पोलिसांत तक्रार!

नाशिक। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक प्रकरणामुळे आता शिवसेना आणि भाजपमध्ये तक्रार युद्ध पेटले आहे. नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी सामनाच्या संपादकांविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखात नारायण राणे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करून नाशिकमध्ये पोस्टर झळकवले आहे, त्यामुळे तक्रार देण्यात आली आहे.

सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांचा उल्लेख करण्यात आला

नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एक तक्रार अर्ज दिला आहे. या तक्रार अर्जावर सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या आजच्या दैनिक सामनाच्या अग्रलेखात नारायण राणे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करण्यात आली आहे.

भाजपकडूनही नाशिक पोलिसांकडे तक्रार करण्यात आली

त्याचबरोबर नाशिकमध्ये राणेंविरोदात पोस्टर झळकवले आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी लवकरात लवकर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे. विशेष म्हणजे, राणेंविरोधात नाशिक पोलिसांतच तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामुळे भाजपकडूनही नाशिक पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

सामना अग्रलेखात काय म्हंटलं?

पंतप्रधान मोदी यांच्या मांडीस मांडी लावून बसणाऱ्या महात्मा नारोबा राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याची भाषा केली. पंतप्रधानांच्या बाबतीत कुणं असं विधान केलं असतं तर त्यास देशद्रोहाच्या आरोपाखाली एव्हाना तुरुंगात डांबलेच असते. नारोबा राणे यांचा गुन्हा त्याच पद्धतीचा आहे.

महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य आहे व एका मर्यादेपलीकडे ही बेताल बादशाही खपवून घेतली जाणार नाही हे कृतीनं दाखवून द्यायची हीच वेळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा बेतालपणा सहन करणार नाहीत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिसांनी सत्त्वशीला पृथ्वीराज चव्हाण यांना घेतले ताब्यात

News Desk

राज्यपाल कोश्यारींनी अभिभाषण अर्धवट सोडणे ‘हा’ महाराष्ट्राचा अपमान! – नाना पटोले

Aprna

राज ठाकरे, प्रवीण गायकवाड समर्थकांमध्ये पुन्हा उत्तर प्रत्युत्तर मालिका सुरूच..!

News Desk