HW News Marathi
महाराष्ट्र

सातारा जिल्हा बँक निवडणूकीत ११ संचालकांची बिनविरोध निवड

मुंबई। साताऱ्यात खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील संघर्ष कमी झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अजित पवार तसेच रामराजे नाईक निंबाळकर यांनी मध्यस्थी केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. सोमवारी उदयनराजे यांनी भेटी घेतल्या आणि या भेटी फळाला आल्या आहेत. राजेंची बिनविरोध निवड झाली असून त्यांना आता सत्ताधारी पॅनलमध्येही घेण्यात आले आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा उदयनराजे यांच्या जागेला विरोध होता यामुळे दोन्हीमध्ये वाद मिटला आहे

११ संचालकांची बिनविरोध निवड

उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह एकूण ११ संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच उदयनराजे भोसले यांचा सर्वसमावेशक पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे. यापुर्वी या पॅनलमध्ये राजेंचा समावेश केला नसल्यामुळे प्रचंड संताप व्यक्त केला होता. यामुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं होते. उदयनराजे सत्ताधारी पॅनलमधून वगळण्यात आल्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर संतापले होते.

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला होता. मात्र सोमवारी उदयनराजे यांनी पुणे-साताऱ्यातील नेत्यांच्या भेटी घेऊन चर्चा केली. यामध्ये विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, पृथ्वीराज चव्हाणांसह अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवेंद्रसिंहराजे यांची समजूत काढली. शिवेंद्रसिंहराजे यांनी नरमाईची भूमिका घेतल्यामुळे सातारा जिल्हा बँक निवडणुकीतील संघर्ष टळला आहे.

माझा संघर्ष हा हाणामारीचा नाही तर विकास चांगला व्हावा. येणारी नगरपालिकेची निवडणूक त्याचे कामकाज चांगले चालावे, नगरपालिकेचे अस्तित्व सातारकरांना दिसलं पाहिजे त्यावर सातारकर आपला निर्णय घेतील अशी आपली भूमिका असल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी म्हटलं आहे.म्हणून आता दोन्ही राजे आता जवजवळ आलेले पाहायला मिळणार.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात बळी गेलेल्यांपैकी मी एक” प्रताप सरनाईकांचं मोठं वक्तव्य!

News Desk

लोकप्रतिनिधींना अशा धमक्या येईपर्यंत गुन्हेगार निर्ढावले ? सुप्रिया सुळेंचा सवाल

Aprna

“यमक जुळवणारी भाषा यशाचं गमक असू शकत नाही”, फडणवीसांनी सरकारला सुनावले

News Desk