HW News Marathi
महाराष्ट्र

परळी महसूल प्रशासनाच्या विरुद्ध कॉंग्रेस आक्रमक; नायब तहसीलदारांच्या दालनात बेशरम फेकून आंदोलन!

बीड | परळी महसूल प्रशासन काम करताना पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप काही दिवसापूर्वीच पत्रकार परिषदेत काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुर भाई यांनी केला होता. आज (मंगळवार, २९ मार्च) काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त होऊन त्यांनी परळी तहसील कार्यालयात आक्रमक आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान नायब तहसीलदार रुपनर यांच्या दालनात ‘बेशरम’ झाडाचा पाला फेकीत प्रशासनाच्या ‘बेशरमपणाचा’ कार्यकर्त्यांनी निषेध केला, असे काॅंग्रेस पदाधिकारी यांनी म्हटले आहे.

महसुलचे अधिकारी पक्षपातीपणे काम करतात असा आरोप पत्रकार परिषदेत काॅंग्रेस शहराध्यक्ष बहादूरभाई यांनी केला होता. परळी तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी पक्षपाती काम करत आहेत. महसूल प्रशासन आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते. गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील रेशन कार्डधारकांच्या मुद्यावर काँग्रेसकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. धान्य न उचलणाऱ्या कार्डधारकांची नवे वगळून ज्यांना धान्य मिळत नाही त्यांना देण्यात यावे यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र काँग्रेस पक्षाकडून करण्यात येणाऱ्या कामांची महसुलच्या अधिकाऱ्यांकडून अडवणूक करण्यात येते, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूरभाई यांनी म्हटले होते.

आज परळी काँग्रेस पदाधिकारी यांनी आक्रमक होत आंदोलन केले. थेट नायब तहसीलदार रुपनर यांच्या दालनात प्रवेश करत निषेध व्यक्त केला. त्याचप्रमाणे नायब तहसीलदार यांना बेशरम दर्शवत व दालनात बेशरम फेकीत प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली. पक्षपातीपणा व सर्वसामान्य नागरिकांची कामे खोळंबून टाकणाऱ्या प्रशासनाच्या ‘बेशरमपणाचा’ बेशरम फेकीत कार्यकर्त्यांनी निषेध केला असे काॅंग्रेस पदाधिकारी यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मोदींची मूर्ती हटवल्याने चक्क राष्ट्रवादी नेत्यांकडून आंदोलन”

News Desk

नाशिकमध्ये भाजपला धक्का ! ५० महिला कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

News Desk

मुख्यमंत्र्यांनी केले वर्ल्ड इकोनॉमिक फोरम च्या निर्णयाचे स्वागत

News Desk