HW News Marathi
महाराष्ट्र

“मोदींची मूर्ती हटवल्याने चक्क राष्ट्रवादी नेत्यांकडून आंदोलन”

पुणे | पुण्याच्या औंध परिसरात मोदी भक्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मंदिर उभारलं होतं. पण आता या मंदिरातील मूर्ती हटवण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर ही मूर्ती हटवण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी राष्ट्रवादीने आज आंदोलन केलं आहे. राष्ट्रवादीच्या या आंदोलनमुळे आता नवीन राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

या रिकाम्या गाभाऱ्यातून मी पुन्हा येईन

पुण्यात राष्ट्रवादीने मोदी मंदिर हटवल्यामुळे आंदोलन केलं आहे. त्यावेळी मूर्ती हटवण्यात आल्याच्या विषयावरुन राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष जगताप यांनी भाजपा नेत्यांवर टीका केली. “या रिकाम्या गाभाऱ्यातून मी पुन्हा येईन, असा आवाज येतोय. आता भाजपाची पुण्यातील सगळी नेतेमंडळी ज्यामध्ये आमदार, खासदार, महापौर हे सारे अन्नत्याग करुन उपोषणाला बसणार आहेत असा निर्णय मला कळालाय. त्यांच्या विनंतीला मान देऊन देव कदाचित पुण्यात येईल म्हणून आम्ही रिकाम्या गाभाऱ्यासमोर हा नैवद्य ठेऊन जाणार आहोत,” असं जगताप म्हणाले आहेत.

देवाला पेट्रोल, गॅस, डिझेल हा नैवद्य आवडतो

आंदोलन करत राष्ट्रवादीने भाजपाची खिल्ली उडवली आहे. “या देवाला पेट्रोल, गॅस, डिझेल हा नैवद्य आवडतो, तो सुद्धा आम्ही घेऊन आलेलो. १९४७ ला देश स्वतंत्र झाल्यापासून २०१४ पर्यंत या नैवद्याचे दर मर्यादित होते. मात्र या देवाला हे खाद्य इतकं आवडतं की त्याने याचे दर वाढवून ठेवलेत. हा नैवद्य दाखवण्याआधीच देव चोरीला गेला. देव रुसून गेलाय. या पुणे शहराचे प्रश्न सोडवण्याची ताकद या देवात नाहीय,” असंही जगताप यावेळी म्हणाले आहेत.

‘एक अंधभक्त, माथेफिरु’

प्रशांत जगताप यांनी त्या मोदीभक्तावरही टीका केली आहे. “चार दिवसांपूर्वी येथील एका अंधभक्ताने, माथेफिरुने नरेंद्र मोदी नावाच्या देवाचं मंदिर निर्माण केलं होतं. चार दिवसांमध्ये पुण्यातील भाजपाने असं चित्र निर्माण केलेलं की नरेंद्र मोदी नावाचे देव पुण्यात अवतरलेत. ते आल्यानंतर पुण्यातील प्रश्न आता संपणार आहेत. पुण्यात रुपयाने पेट्रोल, ४० रुपयांनी डिझेल. २०० रुपयांनी सिलेंडर मिळणार आहे. महागाई संपणार, रस्ते चकाचक होणार, कचरामुक्त पुणे होणार असं चित्र निर्माण करण्यात आलं,” असा टोला जगताप यांनी लगावला आहे.

आता तरी मोदी देवा पावणार का?

मूर्ती भाजपच्या नगरसेविका अर्चना मुसळे यांच्या कार्यालयात असल्याचे सांगितले जात आहे. “आता तरी मोदी देवा पावणार का?, भक्तांच्या मदतीला धावणार का? महागाई कमी करणार का करणार का?,” असं गाणं, आरती म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या मंदिरासमोर पूजा केली. कालच घरगुती वापराच्या सिलेंडरचे दर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर भातुकलीमधील सिलेंडर प्रातिनिधिक स्वरुपात या मंदिरासमोर मांडण्यात आलेला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘लोकांनी तारतम्य बाळगावे’, शरद पवारांची विनंती!

News Desk

तर मी मुंबई कायमची सोडून जाईन,कंगणाचं गृहमंत्री अनिल देशमुखांना चॅलेंज

News Desk

‘…आता आर. आर. पाटील असते तर’, मनसेची मनसुख हिरेन प्रकरणावर प्रतिक्रिया

News Desk