HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांच्या घराबाहेर कॉंग्रेसचं आंदोलन; अतुल लोंढे पोलिसांच्या ताब्यात

मुंबई | महाराष्ट्र काँग्रेसने मुंबईतील मजुरांना उत्तर प्रदेशात जाण्यास भाग पाडलं. त्यासाठी त्यांनी मजुरांना तिकीटं काढून दिली आणि यानंतर संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, असा गंभीर आरोप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केला. यानंतर काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. मोदींनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत काँग्रेस ठिकठिकाणी आंदोलन करत आहे. विशेषतः राज्यातील भाजप नेत्यांच्या घराबाहेर आंदोलनं करून काँग्रेस निषेध करत आहे.

नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आंदोलन सुरू आहे. तर आज (१४ फेब्रुवारी) राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्याबाहेर काँग्रेसने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे फडणवीसांच्या बंगल्याबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, यावरून भाजप नेते सुद्धा आक्रमक झाले आहेत. आता भाजपने सुद्धा काँग्रेसच्या आंदोलनाला जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

 अतुल लोंढे पोलिसांच्या ताब्यात


काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपाने विरोध केला आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांनी ‘तुम्ही फडणवीसांच्या बंगल्याबाहेर येऊनच दाखवा. तुम्ही परत कसे जाता, हे आम्ही पाहतोच’, असे म्हणत नाना पटोलेंना इशारा दिला आहे. दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे हे फडणवीसांच्या घराजवळ दाखल झाले होते. यावेळी त्यांनी जोरजोरात घोषणा देण्यास सुरुवात केली. “नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे. महाराष्ट्रद्रोही भाजपचा निषेध असो”, अशा घोषणा अतुल लोंढे देत होते. मात्र, पोलिसांनी लोंढेंना ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांचीही धरपकड करण्यास सुरुवात केली आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus : महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या १०१ वर, तर पुणे ३, सातार १ रुग्णांची वाढ

swarit

जलसा, प्रतिक्षा, रामायण हे फिल्मसिटीचं वैभव, हे वैभव सुद्धा तिकडे घेऊन जाणार आहात का? राऊतांचा योगींना सवाल 

News Desk

माझ्या शिवसेना प्रवेशाच्या बातम्या म्हणजे केवळ अफवाच !

News Desk