मुंबई | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल (२७ जानेवारी) दिल्ली मेट्रोने प्रवास केला. या प्रवासादरम्यानचा एक फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी कारशेडच्या वादामुळे रखडलेल्या मेट्रो-3 च्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी सरकारला चिमटाही काढला आहे.
“मी दिल्ली विमानतळावर परत येताना मेट्रो रेल्वेने प्रवास केला. नेहमीच्या रस्ते मार्गापेक्षा हा प्रवास अत्यंत कमी वेळेत झाला. मुंबईत मेट्रो-3 मार्गाने मी विमानतळापर्यंत असा कधी प्रवास करु शकेन? महाविकासआघाडी सरकारने कारशेडच्या मुद्द्यावरुन घातलेला गोंधळ पाहता त्याची शाश्वती वाटत नाही”,अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावरुन फडणवीसांना महाविकासआघाडी सरकारमधील २ प्रमुख पक्षाकडून टोमणे लगावण्यात आले आहे.
कॉंग्रेसकडूनही फडणवीसांना टोला
देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली मेट्रोच्या प्रवासाचे निमित्त करून महाविकासआघाडीला चिमटा काढल्यानंतर काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी त्यांना ट्विटवरून लगेच रिप्लाय दिला. देवेंद्र भाऊ तुम्ही आज ज्या दिल्ली मेट्रोने प्रवास केलात ती काँग्रेसच्या काळात सुरु झाली होती. मुंबई मेट्रोही काँग्रेसच्याच कार्यकाळात सुरु झाली. त्यामुळे सकारात्मक राहा. लवकरच मुंबई मेट्रोच्या सर्व मार्गिकांचे बांधकाम पूर्ण होईल, असे सत्यजित तांबे यांनी म्हटले.
Just for you info, Dear Devendra bhau, Delhi metro in which you travelled today, was started by Congress govt in Delhi, similarly Mumbai metro was also started in Congress regime, Pls be positive, we will very soon complete all phases of Mumbai Metro. https://t.co/dfsa1PEFqa
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) January 27, 2021
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूनही टोला –
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीच्या मेट्रोमध्ये प्रवास केलाआणि स्वत:चा फोटो ट्विट केला. तसेच, मुंबई मेट्रोमध्ये प्रवास कधी करता येईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. हा प्रकल्प कधी पुर्ण होईल याची विटारणाही केली. मला नम्रपणे फडणवीसांना सांगायचे आहे की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार मुंबई मेट्रो-३ चा प्रकल्प पुर्ण करण्यासाठी कटीबंध आहेत, काम करत आहेत. तसेच, केंद्र शासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा अडथळा न आणता तो पुर्ण होण्याच्या संदर्भात आपल्याकडूनही मदत झाली तर मुंबईकरांना मोठा दिलासा मिळू शकेल, असा खोचक टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तापसे यांनी फडणवीसांना लगावला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.